आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता धूम्रपान रोखण्यासाठी डिजीटल उपाय: व्हिडिओ गेमद्वारे भीती दाखवून धूम्रपान रोखणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क  - अमेरिकेच्या एफडीएने शालेय विद्यार्थ्यांसाठी व किशोरवयीन मुलांसाठी हॉरर व्हिडिआे बनवला आहे. त्याचे नाव वन लिव्हज असे आहे. हा व्हिडिआे तयार करण्यामागील कारण म्हणजे एकाच वर्षात धूम्रपान करणाऱ्या शाळकरी मुलांची वाढलेली संख्या. २०१८ मध्ये धूम्रपान करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ३८ टक्क्यांनी वाढल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासन हादरले. सीडीसीच्या अहवालानुसार १२ ते १७ या वयोगटातील प्रत्येकी चारपैकी तीन किशोरवयीन मुलांना धूम्रपानाचे व्यसन जडल्याचे दिसून आले आहे.  

 


किशोर गटातील मुला-मुलींना धूम्रपानाचा धोका व्यवस्थित समजावा यासाठी एफडीएने पीसी व एक्सबॉक्स गेम तयार केला आहे. हा व्हिडिआे मोफत पाहता येणार आहे. त्याची सुरुवात गेमर्सला एका भीतिदायक कहाणीशी थेट जोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात धूम्रपानापासून त्यामुळे होणाऱ्या विविध आजार आणि मृत्यूपर्यंतची माहिती दिली जाते. चार प्लेअरच्या या गेममधील तीन प्लेअर वाचू शकत नाहीत. त्यांची फुप्फुसे पूर्णपणे निकामी होतात. वन लिव्हज असे नाव देण्यामागे ४ किशोरवयीनांपैकी केवळ एकच धूम्रपानाचे व्यसन सोडू शकतो, असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बाकी तिघे थांबवू शकत नाहीत. गेममध्ये पुढच्या टप्प्यात गेमर्ससमोर असलेल्या आव्हानांचा मुकाबला धूम्रपान करणाऱ्यालाही करावा लागतो. शेवटी एकच प्लेअर जिवंत राहतो. कारण तो धूम्रपान सोडण्यात यशस्वी होतो. गेमची रचना भूलभुलय्यासारखी करण्यात आली आहे. त्यात कोण सुखरूप बाहेर पडेल, हे अखेरपर्यंत लक्षात येत नाही. एफडीएच्या म्हणण्यानुसार जागृतीच्या अनुषंगाने केलेल्या अभियानाचा परिणाम किशोरवयीन मानसिकतेवर होत नाही. त्यांना व्हिडिआे गेमच्या द्वारे जागृत करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. असा प्रयत्न निश्चितपणे यशस्वी ठरू शकतो.  अमेरिकेत गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. त्यातही सार्वजनिक शस्त्रास्रांचा वापर हा मुद्दा अमेरिकेत अत्यंत गंभीर मानला जातो. त्यानंतर तरूणांमधील व्यसनाधीनता ही सरकारसमोरील समस्या आहे. 

 

 

धूम्रपान करणाऱ्या  तरुणांची संख्या १५ लाखांवर

अमेरिकेच्या सेंटर फॉर कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या संस्थेने एका अहवाल दिला आहे. त्यात तरुण मोठ्या प्रमाणात धूम्रपानाकडे आकर्षित झाल्याचे म्हटले आहे. २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये अशा किशोरवयीन मुलांची संख्या १५ लाखांहून जास्त होती. २०१८ च्या शेवटी ४९ लाख किशोरवयीनांना तंबाखूजन्य पदार्थांची सवय लागली होती.  
 

बातम्या आणखी आहेत...