आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबोधनकारांचा आज स्मृतिदिन...प्रतिकूल परिस्थितीतही केले होते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे नेतृत्व

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- प्रबोधनकार ठाकरे अर्थात केशव सीताराम ठाकरे यांचा आज (20 नोव्हेंबर) स्मृतीदिन. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे ते वडील. प्रबोधनकार ठाकरे हे एक मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते होते. प्रबोधनकारांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांतून आधुनिक विचारांचा प्रसार केला. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण त्यांच्या स्मृतींचा उजाळा देणार आहोत...

 

केशव ठाकरे यांचा जन्म 17 सप्टेंबर 1885 रोजी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे झाला होता.
महात्मा फुले यांना ते आपला आदर्श मानत होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाज सुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या होत्या. महात्मा फुले यांचा लढा सुरू ठेवण्यासाठी प्रबोधनकारा पुण्यात स्थायिक झाले होते. अन्याय रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून प्रबोधनकारांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला.

 

प्रबोधनकार हे लेखक, पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला.

 

पुढील स्लाइडवर वाचा- प्रबोधनकारांनी दिला अन्यायाविरुद्ध लढा...

 

बातम्या आणखी आहेत...