आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : स्मृती इराणी-हरसिमरत यांनी खेळली फुगडी, तर सुप्रिया सुळे-किरण खेर, कनिमोळींनीही धरला फेर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सोशल मीडियावर सध्या स्मृती इराणी आणि हरसिमरत कौर यांचा फुगडी खेळतानाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हरसिमरत कौर-बादल यांनी स्वतः ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. संसदेत शुक्रवारी मोदी सरकारचा 2019 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यानंतर काही महिला खासदार लंचसाठी एकत्र जमल्या होत्या. त्यावेळचा हा व्हिडिओ आहे. यावेळी स्मृती इराणी आणि हरसिमरत कौर यांच्यासह किरण खेर, सुप्रिया सुळे, अनुप्रिया पटेल आणि कनिमोझी यांचीही याठिकाणी उपस्थिती होती. 


शुक्रवारी बजेट सेशलनंतर लंचदरम्यान लोकसभेतील महिला खासदार लंचसाठी एकत्र जमल्या होत्या. त्यावेळी गप्पांदरम्यान त्यांच्यामध्ये लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. त्यानंतर विषय निघाल्याने स्मृती इराणी, हरसिमरत कौर, किरण खेर, सुप्रिया सुळे, अनुप्रिया पटेल आणि कनिमोझी अशा सर्वांनी एकत्रितपणे गिद्दा (पंजाबी नृत्यप्रकार) करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्मृती इराणी आणि हरसिमरत कौर यांनी दोघींनी एकत्रित फुगडी (गिद्दा) घालून सर्वांना दाखवले. परस्पर विरोधी पक्षाच्या खासदार असतानाही वैयक्तीक जीवनात या सर्वांनी जपलेल्या नात्याचे सोशल मीडिया यूझर्सनेही कौतुक केले. 


हरसमिरत यांनी लिहिले..जीवनाची जादू चालली..
हरसमिरत कौर यांनी या व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले, जीवनाने आमच्यावर काल दुपारी जादू केली आणि त्यामुळे रोजसारखेच दुपारचे जेवण आम्हाला बालपणीच्या सहलीचा अनुभव देऊन गेले.
पाहा त्यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ...

 

Life worked its magic on us yesterday afternoon, when a routine lunch became a trip to childhood. @smritiirani @KirronKherBJP @AnupriyaSPatel @KanimozhiDMK @supriya_sule pic.twitter.com/PEyJMEzL7r

— Harsimrat Kaur Badal (@HarsimratBadal_) February 1, 2019

 

बातम्या आणखी आहेत...