आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Smriti Irani Files Nomination From Amethi Second Time In A Row In Lok Sabha Election

अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा उमेदवारी अर्ज दाखल, दुसऱ्यांदा राहुल गांधींशी थेट लढत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेठी - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गुरुवारी अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी अमेठीतून खासदारकीसाठी अर्ज दाखल करण्याची ही दुसरी वेळ आहे. स्मृतींनी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी स्मृती इराणी यांनी पूजा अर्चना केली. त्यानंतर रोड शो करून आपला अर्ज दाखल केला. यापूर्वी झालेल्या लोकसभा 2014 च्या निवडणुकीत त्यांना राहुल गांधींनी पराभूत केले होते.


स्मृती इराणी यांनी 2003 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना सर्वप्रथम 2004 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी काँग्रेसचे दिग्गज नेते कपिल सिब्बल यांच्या विरोधात उतरल्यानंतर त्यांना पराभव चाखावा लागला होता. या पराभवानंतर त्यांचा आणि भाजपच्या पक्ष श्रेष्ठींमध्ये वाद देखील झाला होता. वाद इतका चिघळला, की स्मृतींनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. तेव्हापासून भाजपमध्ये विविध पदांवर कार्यरत राहिल्यानंतर त्यांना 2014 मध्ये अमेठी येथून उमेदवारी देण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा गढ अमेठीतून त्या 1 लाख 7 हजार 923 मतांनी पराभूत झाल्या होत्या. स्मृतींचा पराभव झाला तरीही 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. याच सरकारमध्ये त्यांना केंद्रात मंत्री पद देण्यात आले. गेल्या 5 वर्षांपासून अमेठीचे दौरे करून स्थानिकांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्मृतींना भाजपने दुसऱ्यांदा अमेठीतून उमेदवारी दिली आहे.