Amethi / अमेठीत स्मृती इराणी यांच्या विश्वासू सहकाऱ्याची हत्या; अंत्ययात्रेत स्मृती इराणी यांनी दिला पार्थिवाला खांदा

सात जण अटकेत, स्थानिक पंचायत सदस्यांवर संशय
 

दिव्य मराठी नेटवर्क

May 27,2019 08:25:00 AM IST

अमेठी - राहुल गांधी यांना पराभूत करून अमेठीतून निवडून आलेल्या स्मृती इराणी यांचे विश्वासू सहकारी सुरेंद्र सिंह यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी बरौलिया गावातील घराच्या व्हरंड्यात झोपलेल्या सुरेंद्र सिंह यांच्यावर गोळ्या झाडल्या. ते या गावचे माजी सरपंच होते.


सुरेंद्र सिंह यांच्या मुलाने या हत्येबद्दल काँग्रेसवर आरोप केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिस महासंचालकांना १२ तासांत हल्लेखोरांना पकडण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी ७ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती डीजीपी ओमप्रकाश सिंह यांनी दिली. दरम्यान, स्मृती इराणी यांनी आवश्यकता पडल्यास न्यायासाठी सर्वाेच्च न्यायालयात जाणार असल्याचे दिल्लीत सांगितले.

अंत्ययात्रेत स्मृती इराणी यांनी दिला पार्थिवाला खांदा
हत्येची बातमी कळताच स्मृती इराणी यांनी अमेठी गाठले. सुरेंद्र सिंह यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांनी या कुटुंबीयांची जबाबदारी आपली असल्याचे सांगितले. अंत्ययात्रेत त्यांनी पार्थिवाला खांदा दिला.

X
COMMENT