आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Smriti Irani Reached Siddhi Vinayaka, Walking 14 Kilometers Barefoot, Saying 'This Is God's Will ...'

मुंबई : स्मृती इराणी 14 किलोमीटर अनवाणी पायांनी चालत पोहोचल्या सिद्धिविनायकाला, म्हणाल्या - 'ही देवाचीच इच्छा...' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : स्मृती ईरानी सोमवारी रात्री उशिरा आपल्या 14 किलोमीटरपर्यंत अनवाणी पायांनी चालत मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात पोहोचल्या. यांनतर स्मृती इराणी यांच्यासोबत त्यांची मैत्रीण आणि फिल्म निर्माती एकता कपूरदेखील होती. स्मृती यांनी अशातच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठीमध्ये लोकसभा निवडणुकीत हरवले. 

 

एकताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती हे म्हणताना दिसत आहे की, "आम्ही सिद्धिविनायकाकडे जात आहोत आणि आणि स्मृती पायात चप्पल न घालता चालत आहे. 14 किलोमीटरपर्यकान्त अनवाणी पायांनी. स्मृतीवर विश्वास बसत नहिये. ही देवाचीच इच्छा आहे. चला."

 

एकताने शेअर केला फोटो... 
एकताने दोघींचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. हा फोटो 14 किमी. पायी चालल्यानंतर मंदिरातील आहे. एकताने लिहिले, "14 किलोमीटर चालून सिद्धिविनायकला पोहोचल्यानांतरची चमक." यावर स्मृती इराणी यांनी उत्तर दिले, 'देवाची इच्छा आहे. देव दयाळू आहे.' 

 

एकताने असे केले होते विजयी झाल्यांनतर अभिनंदन... 
एकताने स्मृती यांना विजयी झाल्यांनतर शुभेच्छा देण्यासाठी ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. एकताने लिहिले होते, "नात्यांचे रूप बदलते. नवीन नवीन पद्धतीने समोर येतात. एक पिढी येते, एक पिढी जाते...बनते कहाणी नवी."

बातम्या आणखी आहेत...