आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरू- अभिनेत्री दीपिका पादुकोणने मंगळवारी रात्री जवाहरलाल नेहरू यूनिव्हर्सिटी (जेएनयू) मध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग नोंदवला होता. यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. बँगळुरूमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात स्मृती म्हणाल्या की, जे लोक आपल्या सैनिकांच्या मृत्यूवर आनंद साजरा करतात, दीपिका त्यांच्या बाजूने उभी होती.
दीपिका जेएनयू कँपसमध्ये 10 मिनीटे विद्यार्थ्यांच्या सोबत होती. पण, इथे तिने आंदोलनात कोणालाही संबोधित केले नाही. दीपिका ज्या वेळेस जेएनयूमध्ये पोहचली, त्या वेळेस कन्हैया कुमार भाषण देत होते.
दीपिकाने 2011 मध्ये पंतप्रधान पदासाठी राहुल गांधीना समर्थन दिले होते
इराणी पुढे म्हणाल्या की, दीपिकाने आपली राजकीय आवड आणि विचारधारा 2011 मध्ये जाहिर केली होती, जेव्हा तिने काँग्रेसचे समर्थन केले होते. मला तिच्या राजकीय विचारधारेबद्दल जाणून घ्यायचे आहे. जे मुलींना मारतात, त्यांच्यासोबत उभी राहिल्याने मी तिचा विरोध करत आहे. हीच तिचे स्वातंत्र्य आहे का? भारत तुझे तुकडे होणार, म्हणनाऱ्यासोबत उभे राहणे बरोबर आहे का? असे मत इराणी यांनी व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.