आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृती इरानींच्या जवळच्या कार्यकर्त्याची अमेठीमध्ये गोळ्या झाडून हत्या, इरानींच्या प्रचारात मोठी जबाबदारी पार पाडली होती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेठी(उत्तर प्रदेश)- लोकसभा निवडणुकीत स्मृती इरानींच्या प्रचारात मोठी जबाबदारी पार पाडणाऱ्या भाजप नेत्याची रात्री ते झोपेत असताना हत्या करण्यात आली आहे. घटनेमुळे अमेठीत एकच गोंधळ उडालाय. यानंतर पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी तैणात करण्यात आलाय. पोलिसांनी अनेक संशयीतांना ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच स्मृती ईरानीदेखील दिल्लीवरून अमेठीसाठी रवाना झाल्यात.


अमेठीमधील गौरीगंजच्या जामों ब्लॉकच्या बरौलिया ग्राम पंचायतचे माजी सरपंच सुरेंद्र सिंह यांची अज्ञान आरोपींनी गोळ्या झाडून हत्या केली. मृत सुरेंद्र आपल्या घराच्या बाहेर झोपलेले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.


त्यांच्या मुलाने सांगितले की, सुरेंद्र भाजप नेत्या स्मृती ईरानींच्या खूप जवळचे होते. लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान त्यांच्यावर प्रचाराची मोठी जबाबदारी देण्यात आलीह होती. स्मृती ईरानींच्या विजयानंतर विजय रॅली काढण्यात येत होती, पण ही बाब काँग्रेस नेत्यांच्या पचणी पडणारी नव्हती, त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली आहे.


पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाब घेत ग्रामस्थांना विचारपूस करून, आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी सुरू केली आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, त्यामुळे पोलिसांनी घटनास्थीळी पोलिसांचा मोठा ताफा तैणात केला आहे.