आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मृती यंदा सर्वाेत्कृष्ट खेळाडूची मानकरी; वनडे, टी-२० मध्ये ६०० पेक्षा अधिक धावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्राची प्रतिभावंत महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाला  अायसीसीच्या सर्वाेत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार जाहीर झाला. महिला क्रिकेटपटूचा रचल हेहो फ्लिंट पुरस्कार जाहीर झाला. त्याचबरोबर तिला सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटपटूचाही पुरस्कार मिळाला आहे.  हा मानाचा पुरस्कार जिंकणारी ती महाराष्ट्राची पहिली व भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली. यापूर्वी माजी कर्णधार झुुलन गाेस्वामीला (२००७) या पुरस्काराने गाैरवण्यात अाले हाेते.  आयसीसीने  पुरस्कार साेमवारी जाहीर केले आहेत.  तसेच ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हेलीला यंदाच्या सत्रात सर्वोत्कृष्ट टी-२० महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला आहे.  इंग्लंडची क्रिकेटपटू सोफी एक्लेस्टोनला आयसीसी महिला इमर्जिंग क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला आहे.  तिने यंदाच्या सत्रात १२ वनडे सामन्यांत ६६.९० च्या सरासरीने ६६९ धावा केल्या आहेत. यादरम्यानची तिची कामगिरी काैतुकास्पद ठरली. याशिवाय तिने  २५  टी-२० सामन्यांत २८.२७ च्या सरासरीने ६२२  धावा केल्या आहेत.  तिने या छाेट्या फाॅरमॅटमध्ये यंदा अव्वल कामगिरीची नाेंद केली अाहे. 

 

घरच्या मैदानावरच्य खेळीने काैशल्य सिद्ध : स्मृती
या पुरस्काराने सत्रात केेलेल्या मेहनतीचे मला फळ मिळाले. त्यासाठी मी सातत्याने दर्जेदार कामगिरी केली अाणि अापल्या घरच्या मैदानावर स्वत:मधील काैशल्य सिद्ध केले. यामुळेच मला हा पल्ला गाठता अाला, अशी प्रतिक्रिया पुरस्कार विजेत्या स्मृतीने दिली. दक्षिण अाफ्रिकेविरुद्धची १३५ धावांची खेळी ही अविस्मरणीय ठरल्याचेही तिने सांगितले. याशिवाय विश्वचषकातील कामगिरीही माझ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली, असेही तिने या वेळी स्पष्ट केले.

स्मृती, पूनमची वनडे-टी-२० संघात निवड


अायसीसी वनडे टीम 
स्मृती मंधाना, टेमी बिऊमाेंट, सुझी बेट्स (कर्णधार), डेन वान, साेफिया डेव्हिने,एलिसा हिली मारिजाने कॅप, डिनड्रा डाॅटिन, सान मीर, साेफिया एकेलस्टाेन, पुनम यादव.


अायसीसी टी-२०
स्मृती मंधाना, एलिसा हिली, सुझी बेट्स, हरमनप्रीत काैर (कर्णधार), नतालिया सिव्हर, एलिसा पेरी, एस्लिघ गार्डनर, लिघ कास्पेरेक, मेघन स्कट, रुमाना अहमद, पूनम यादव.

अायसीसी क्रमवारी : बुमराह १६ व्या स्थानी, विराट काेहलीचे अव्वल स्थान कायम
अाॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसरी कसाेटी गाजवणाऱ्या गाेलंदाज जसप्रीत बुमराहने क्रमवारीतही १२ स्थानांनी प्रगती साधली. त्याने करिअरमध्ये प्रथमच १६ व्या स्थानावर धडक मारली. काेहलीने फलंदाजीच्या क्रमवारीतील अव्वल स्थान कायम ठेवले. 

 

आयसीसी पुरस्कार विजेत्या महिला क्रिकेटपटू 
- रचल हेहो फ्लिंट पुरस्कार
स्मृती मानधना (भारत)  
- सर्वोत्कृष्ट वनडे महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना (भारत)  
- सर्वोत्कृष्ट टी-२० महिला क्रिकेटपटू एलिसा हेली (ऑस्ट्रेलिया)  
- महिला एमर्जिंग क्रिकेटपटू 
सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड)