क्रिकेट / सर्वात वेगवान धावा करणारी स्मृती पहिली भारतीय खेळाडू

विराटला खेळावे लागले होते ५२ डाव, धवन ४८ ​​​​​​​डावांसह अव्वल
 

Nov 08,2019 08:11:00 AM IST

अँटिग्वा - स्मृती मानधनाने केवळ ५१ डावांत २ हजार धावा करून इतिहास घडवला. सर्वात वेगवान २ हजार धावा करणारी ती पहिली भारतीय महिला फलंदाज ठरली. तिने विराट कोहलीलाही मागे टाकले. २३ वर्षीय मानधनाने वेस्ट इंडीजविरुद्ध हा विक्रम केला. तिने ४३.०८च्या सरासरीने एकूण २,०२५ धावा केल्या आहेत. शिखर धवनने केवळ ४८ डावांत २ हजार धावांचा टप्पा गाठला होता. सर्वात वेगवान धावांचा विक्रम त्याच्याच नावे आहे.

जगातील सर्वात वेगवान तिसरी महिला क्रिकेटर

वन डेमध्ये सर्वात वेगवान २ हजार धावा करणारी मानधना तिसरी आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्क (४१ डाव) आणि मेग लेनिंग (४५) यांच्या नावे ही कामगिरी आहे.

X