आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • SMS Will Notify More Than An Hour Of Delay Due To The Fog, Cold Weather Disrupts The Schedule Of 500 Trains Daily.

धुक्यामुळे तासाहून जास्त विलंबाच्या गाड्यांची माहिती एसएमएसने मिळणार, थंडी वाढल्याने दररोज 500 गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगरमध्ये बर्फवृष्टीचा आनंद लुटताना पर्यटक - Divya Marathi
श्रीनगरमध्ये बर्फवृष्टीचा आनंद लुटताना पर्यटक

नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणात धुके दाटू लागले आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पार विस्कळीत झाले आहे. रेल्वे विभागाच्या म्हणण्यानुसार धुक्यामुळे दररोज सुमारे ५ लाखांहून जास्त रेल्वे प्रवासी त्रस्त होऊ शकतात. १५ मिनिटे विलंबाने येणाऱ्या गाड्यांना वगळले तरी ५०० हून जास्त गाड्या जास्त विलंबाने धावतील. त्यातून ५८ कोटी रुपयांचा फटका बसू शकतो.

रेल्वे मंडळाचे कार्यकारी राजेश दत्त म्हणाले, धुक्याचा सामना करण्यासाठी रेल्वेने ६२ रेल्वे रद्द केल्य. ५० गाड्यांच्या फेऱ्याही कमी करण्यात आल्या आहेत. तासाभराहून विलंबाने धावणाऱ्या गाड्यांच्या प्रवाशांना एसएमएसने माहिती मिळेल. राजधानी, शताब्दी, दुरंतो, वंदे भारत, तेजस, एक्स्प्रेस श्रेणीतील सुमारे ७ हजारांवर रेल्वेत उपग्रहाने संचलित फॉग सेफ्टी डिव्हाइस व कलर लाइट सिग्नल लावले आहेत. त्याद्वारे चालकास सिग्नलद्वारे माहिती मिळेल. धुके असलेल्या मार्गांवर गाड्यांचा वेग ताशी ७५ किमी निश्चित केला आहे. गेल्या वर्षी हा वेग ताशी ५० किमी होता. म्हणूनच ६० ते ७० टक्के गाड्या २ ते ३ तास उशिराने धावतील.

रेल्वे चालकाला वैमानिकासारखी हवामानाबद्दलची माहिती मिळेल

- धुक्यात ड्युटी सुरू करण्यापूर्वी लोको पायलट व गार्डला ट्रेन चालवणे आणि आणीबाणीपासून निपटण्यासाठी एक आठवड्याचे प्रशिक्षण दिले आहे. वैमानिकासराखे लोको पायलटला मार्गावरील हवामानाची ताजी माहिती मिळेल.
- अधिकारी इंजिनात बसून निगराणी ठेवतील.
- सामान्यपणे निश्चित वेगापेक्षा मंद गतीने गाडी चालवल्यास चार्जशीट जारी केली जाते. परंतु धुक्यामुळे हा नियम लागू होत नाही.
- स्थानकांवर रुळाची देखरेख करण्यासाठी अतिरिक्त तैनाती होईल. कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वॉकी-टॉकी दिली जाईल. लाईनच्या तपासासाठी जीपीएसवर आधारित हँडहॅल्ड उपकरण दिले.
- फॉग हट व रेल्वे लाईन यादरम्यानच्या क्षेत्रात पांढरा रंग लावलेला आहे. धुक्यात गाडीचा प्रकाश पडल्यावर तो रंग चमकतो.

बातम्या आणखी आहेत...