आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काम करताना सापाने केला दंश, व्यक्तीने फिल्मी स्टाइलने ओढले विष; मग सापाला प्लास्टिकमध्ये घेऊन रुग्णालयात झाला दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदौर - जिल्ह्यातील मुंडला गावातील एका व्यक्तीला घरात काम करताना साप चावला. त्याने तत्काळ साप चावलेल्या ठिकाणापासून थोडे दूर कपड्याने गच्च आवळून बांधले. चित्रपटात दाखवतात तसे स्वतः तोंडाने विष बाहेर ओढले. या प्रकारानंतर कुटुंबीय व्यक्तीला आणि सापाला घेऊन उपचारार्थ रुग्णालयात घेऊन गेले. 

 

रामचंद्र यांनी सांगितले की, मुंडला गावातील रहिवासी रमेशला घरात काम करत असताना सापाने दंश केला होता. घबराटीने घरातील उपस्थित लोकांनी सापाला मारून टाकले आणि रमेशला उपचारार्थ एमवाय रुग्णालयात घेऊन गेले. येथे रमेश मृत सापाला घेऊन फिरत असल्यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता. 

 

रामचंद्रने सांगितले की, सापाने चावा घेताच रमेशने हाताला कपड्याने बांधले आणि त्यानंतर सापाच्या विषाला तोंडाने ओढून बाहेर काढले. डॉक्टरांना योग्य उपचार करता यावे यासाठी आम्ही सापाला रुग्णालयात आणले असल्याचे त्याने सांगितले. डॉक्टरांच्या मते, रमेश प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. 

बातम्या आणखी आहेत...