आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप चावल्याने युवकाचा मृत्यू; तंत्र-मंत्राने पुन्हा जिवंत करण्याच्या उद्देशाने सापाला केले कैद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुर्ग (छत्तीसगड) - जिल्ह्यातील भेडसर गावात सोमवारी एक युवकाचा सर्पदंशना मृत्यू झाला. ज्या सापाने युवकाला चावा घेतला त्याला ग्रामस्थांनी बंदी बनवून ठेवले आहे. उपचारादरम्यान सापाची आवश्यकता भासेल असे त्यांना वाटले होते. जवळपास 20 तास युवकावर उपचार सुरू होते. पण त्याला वाचवण्यात यश आले नाही. युवकाच्या मृत्यूनंतरही ग्रामस्थ सापाला सोडण्यास तयार नाहीत. 

 

युवक सुभाष सुखसागर देशमुख नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी 9 वाजता कामासाठी निघाला होता. गाडीवर बसून किक मारताच तेथे बसलेल्या सापाने त्याला दंश केला. आसपासच्या शेजारी जमा झाले आणि त्यांनी सापाला पकडून कैद केले. कुटुंबीय सुभाषला घेऊन जिल्हा रूग्णालयात गेले. तेथे उपचार न झाल्यामुळे त्याला दुसऱ्या रूग्णालयात हलविण्यात आले. तेथे सोमवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास सुभाषचा मृत्यू झाला. इकडे एखाद्या तंत्र-मंत्राने युवकाला पुन्हा जिवंत केले जाऊ शकते या अपेक्षेपोटी ग्रामस्थांनी सापाला कैद करून ठेवले आहे.