आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Snake Came On The Field During The Andhra Vidarbha Match, , Video Shared By BCCI

आंध्रा-विदर्भ सामन्यादरम्यान मैदानावर आला साप, बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटनेचा व्हिडिओ बीसीसीआय डोमेस्टिकने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे

स्पोर्ट डेस्क- रणजी ट्रॉफीमध्ये आंध्रप्रदेश आणि विदर्भ संघाचा सामना सुरू होता. यावेळी एक विचित्र घटना घडली. आज झालेल्या सामन्यादरम्यान मैदानावर एक सापाने दर्शन दिले. यावेळी सामना सुरू नव्हता, खेळाडू आपली फील्डिंग पोझिशन लावत होते. हा साप मैदानावर आल्याने सामन्याला थोडा उशीर झाला.

घटनेचा व्हिडिओ बीसीसीआय डोमेस्टिकने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. त्यासोबत कॅप्शन लिहीले, 'सापाने खेळ थांबवला. मैदानावर एक पाहुणा आला होता, ज्यामुळे सामना सुरू होण्यास थोडा उशीर झाला.' व्हिडिओत साप मैदानावर फिरताना दिसत आहे, तर ग्राउंड स्टाफ त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.  (देश, विदेश आणि मनोरंजनासह आपल्या शहरातील अपडेट बातम्यांसाठी इंस्टॉल करा Divya Marathi App)