आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्पदंशाने जगभरात दरवर्षी होतो 1.38 लाख लोकांचा मृत्यू, तर अपंगत्वाचे प्रमाण 4 लाख

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क- साप चावल्यानंतर होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अद्यापही थांबलेले नाही. सर्पदंश झाल्याने जगभरात दररोज 200 जणांना आपला प्राण गमवावा लागतो. इतकेच नाही तर सर्प दंशाने दरवर्षी जगभरात 1 लाख 38 हजार लोकांचा मृत्यू होतो. तसेच सापाचे विष भिनल्याने वर्षाला जवळपास 4 लाख लोक अपंग होतात. सर्वात जास्त घटना अफ्रिकेच्या सहारा भागात आणि अशियामध्ये होतात. या मृत्यूचे सर्वात मोठे कारण म्हणजे जगात अँटी व्हेनमची(सापाचे विष नष्ट करणारे औषध) कमतरता असणे.


कोब्रा चावल्यावरही जिंवत
थायलंडचे अग्निशामक दलाचे कर्मचारी पिन्यो पूकपिन्यो यांनी सांगितले की, त्यांना हाताच्या अंगठ्याला कोबरा साप चावला होता, पण अवघ्या 15 मिनिटांत त्यांनी रूग्णालयात गाठले. तेथे त्यांना तत्काळ अँटी व्हेनम देण्यात आले. डॉक्टरला सुरूवातीला विश्वास बसला नाही की, त्यांना कोब्रा साप चावला आहे. तेव्हा त्यांनी सांगितले की, मी लोकांना सापांविषयी प्रशिक्षण देतो. त्यानंतर डॉक्टरांना त्यांच्यावर विश्वास बसला.

 

पिन्योंनी हेही सांगितले की, कोब्राच्या विषाच्या दोन महिने माझ्या शरीरावर प्रभाव होता. त्यामुळे त्यांना दोन वेळेस सर्जरी करावी लागली. पण अनेक लोक पिन्योसारखे नशीबवान नसतात. विषारी साप चावल्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात जाता येत नाही किंवा रूग्णालयात अँटी व्हेनम उपलब्ध नसते. त्यामुळे त्यांना मृत्यूंना मुकावे लागतात. यूकेच्या वेलकम ट्रस्टनुसार, उष्णकटिबंध भागात कोणत्याही आजारापेक्षा जास्त मृत्यू सर्पदंशाने होतात. साप चावल्यानंतर व्यक्ती जिवंत राहू शकतो पण रूग्णाला योग्य वेळी अँटी व्हेनम देणे गरजेचे आहे.

 

हा आहे नवीन प्लॅन 
सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा योजना तयार केली आहे. यासाठी 2030 पर्यंत 136 मिलियन डॉलर (943 कोटी रूपये) खर्च केले जाणार आहेत. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना अँटी व्हेनम वेळेवर मिळू शकेल. तसेच, वेलकम ट्रस्टही स्नेकबाइटच्या उपचारासाठी येणाऱ्या 7 वर्षात 101 मिलियन डॉलर (करीब 700 कोटी रूपये) खर्च करणार आहे.  

 

तंत्रज्ञानात झाला बदल
19 व्या शतकापासून अस्तित्वात असलेल्या पद्धतीमध्ये आता थोडा बदल झाला आहे. एका सापातून विष काढल्यानंतर प्रतिजैविक चाचणी करण्यासाठी अल्प प्रमाणात घोड्याला किंवा इतर प्राण्यांना दिले जाते. त्यानंतर विषबाधाविरूद्ध अँटीबॉडी मिळवण्यासाठी प्राण्यांचे रक्त काढून शुद्ध केले जाते. शास्त्रज्ञ फिल प्राइसनुसार, अँटी व्हेनम सध्यातरी चांगल्या अवस्थेत आहे, पण उत्कृष्ट असे नाही. इतर औषधीप्रमाणे याचे चिकित्सक परिक्षम केले जात नाही.

 

विषारी सापाचा धोका कोठे
प्राइसनुसार, स्नेकबाइट सध्या जगातील सर्वात धोकादायक प्रकार आहे. अफ्रीकामध्ये व्हायपर हा साप आढळतो. तर मिडल-ईस्ट (पश्चिम अशिया), पाकिस्तान आणि दक्षिण-पुर्व अशियामध्ये रसल व्हायपर यांचे प्रमाण जास्त आहे. तसेच, भारताच्या अनेक भागात रसल व्हायपर आणि केरळमध्ये किंग कोब्रा आढळतो.