आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोड आणि तिखटाचा मेळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आलू भुजिया पोटली - Divya Marathi
आलू भुजिया पोटली

स्नेहा शिंपी

आलू भुजिया पोटली 

साहित्य : १ कप आलू भुजिया, १ बारीक चिरलेला कांदा, १-२ हिरव्या मिरच्या, अर्धा कप कोथिंबीर,  १ उकडून बारीक चिरलेला बटाटा, १ लहान चमचा चाटमसाला, १ कप मैदा, चवीनुसार मीठ.  

कृती : मैदा चाळून तेल, मीठ, पाणी घालून पीठ मळा. पिठाच्या लहान गोळ्या बनवून पुऱ्या लाटा. बाऊलमध्ये भुजिया, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, उकडलेला बटाटा, चाटमसाला मिसळा. हा मसाला पुऱ्यांमध्ये भरून त्याची पोटली बनवा. सोनेरी रंगावर तळा. हिरवी चटणी किंवा साॅससह सर्व्ह करू शकता.पुदिना-बटाटा बाॅल्स

साहित्य : मध्यम आकाराचे २, किसलेले बटाटे , १ कप किसलेलं चीज,  ७-८ पुदिना पाने, ४-५ मिरच्यांची पेस्ट, ३ चमचे लोणी, १ छोटा चमचा काॅर्न फ्लोअर. चवीपुरते मीठ, मिरपूड.

कृती : सर्व साहित्य एकत्र करून पाणी न घालता एकजीव करून घ्या. घट्ट गोळा करून वीस मिनिटं झाकून ठेवा.  लोणी वापरून गोळा मळण्यायोग्य करा. त्याचे सुपारी एवढे गोळे करा. हे गोळे ३५० डिग्रीवर ५-७ मिनिटं बेक करा. गोळे लगेच काढून घेऊन वीस मिनिटांनंतर गरम तेलात गोल्डन रंगावर तळा. साॅससह सर्व्ह करा. कोफ्ता टोमॅटो

साहित्य :  प्रत्येकी  दीड कप लापशी रवा आणि पाणी, १ चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, हे सर्व साहित्य कुकरमध्ये शिजवून घ्या. थंड झाल्यावर छोटे  गोळे करा. ग्रेव्हीसाठी ३ टोमॅटो, १ छोटा तुकडा आलं, १ हिरवी मिरची, पाव टीस्पून हळद पावडर, २ लवंगा, २ दालचिनी, ५ लसूण पाकळ्या हे साहित्य व्यवस्थित वाटून घ्या. तळण्यासाठी तेल.कृती : कढईत तेल गरम करा. लापशीचे गोळे तळा. अतिरिक्त तेल काढून ग्रेव्ही पेस्ट घालून चांगले परता. आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी आल्यावर मीठ घाला. ग्रेव्ही थोडी घट्ट झाल्यावर त्यात तळलेले कोफ्ते घालून सर्व्ह करा.पनीर लाॅलीपाॅप 

साहित्य : १ कप किसलेले पनीर, २ उकडलेले बटाटे,  दीड चमचा आलं पेस्ट,  १ चमचा लसूण पेस्ट, २ चमचे सोया सॉस, पाव कप चिरलेली कोथिंबीर,  १ चमचा कॉर्न स्टार्च, अर्धा चमचा पांढरी मिरपूड, २ हिरव्या मिरच्या,  पाव कप चिरलेला कांदा, ३ चमचे मैदा, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल, ८-१० लाकडी स्टिक्सकृती : बटाटे सोलून कुस्करून घ्या. गुठळ्या राहू नये. मैदा सोडून सर्व साहित्य एकत्र मळा. मध्यम आकाराचे ८-९ घट्ट गोळे बनवा. त्यात लाकडी स्टिक घालून मुठीने नीट आवळा. असे बनवलेले लाॅलीपाॅप कोरड्या मैद्यात घोळवा.  किंचित हलवून जास्तीचा मैदा काढा. सर्व लाॅलीपाॅप घ्या. शेजवान साॅस किंवा टोमॅटो केचपसह सर्व्ह करा.
 

सफरचंदाची दहीपुरी

साहित्य : अर्धा कप मोड आलेले मूग, १ बारीक चिरलेला टोमॅटो, १ बारीक चिरलेला कांदा, २ बारीक चिरलेले हिरवे सफरचंद, अर्धा कप उकडलेल्या बटाट्याचे बारीक तुकडे, १ मोठा चमचा हिरव्या मिरचीचे तुकडे, थोडी कापलेली कोथिंबीर, २ मोठे चमचे चाट मसाला, २ मोठे चमचे लिंबूरस, २ डझन पाणीपुरी. सजावटीसाठी २ कप फेटलेले दही , १ मोठा चमचा जिरेपूड, मीठ चवीनुसार. कृती : मोठ्या बाऊलमध्ये सफरचंदाचे तुकडे करून घ्या. सर्व साहित्य त्यात मिसळा. मिठाची गरज असेल तरच घाला. हे मिश्रण दहा मिनिटं तसंच ठेवा. सर्व्ह करण्यापुर्वी थोडे थंड करा. पाणीपुरीमध्ये हे मिश्रण भरा. पुरीवर १-२ चमचे फेटलेले दही घालून सर्व्ह करा. किसमिस रसमलाई

साहित्य : २०० ग्रॅम पनीर, १ लिटर क्रीम दूध , २ लहान चमचे मैदा , १ मोठा चमचा मनुका , २ मोठे चमचे बदाम, १ लहान चमचा पिस्त्याचे काप , १० -१२ केशरचे धागे, अर्धा लहान चमचा गुलाबपाणी, चवीनुसार साखर, तळण्यासाठी तूप.

कृती : दूध अर्धे होईपर्यंत उकळा. त्यात साखर, बदाम,पिस्ता टाका. केशर गुलाबपाण्यात घोळवा. पनीर हाताने मॅश करा. त्यात मैदा मिसळून त्याचे लहान गोळे बनवा. त्यात मनुके भरून मंद आचेवर फिकट गुलाबी रंगावर तळा.  हे गोळे घट्ट दुधात टाका. दोन तासांनंतर सर्व्ह करा.केशर काजू बर्फी
 

साहित्य : २०० ग्रॅम काजू तुकडा, १५० ग्रॅम साखर, अर्धा लहान चमचा केशर, २ वाट्या दूध. 
 

कृती : काजू दोन तास दुधात भिजवा. मिक्सरमधून पेस्ट बनवा. १ चमचा गरम दुधात केशर घोळवून घ्या. त्यात काजू पेस्ट मिसळा. पॅनमध्ये काजू पेस्ट व साखर मिसळून गॅसवर ठेवा. बटरपेपरवर मिश्रण पसरवून लाटण्याने पातळ लाटा. मग कापून सर्व्ह करा.