आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुन्न झालो आम्ही तुझ्या जाण्याने...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 स्नेहल धात्रक

आज मी घरातून बाहेर पडताना होते तशीच घरी येईल की माझंही प्रियंकासारखंच काही बरंवाईट होईल याची कुटुंबाला काळजी असते. जोपर्यंत आपली न्यायव्यवस्था सक्षम होत नाही तोपर्यंत माझ्यासारखी प्रत्येक स्त्री भीतीच्या छायेतच वावरेल...


मी हे लिहितेय खरी, पण त्याचा काही उपयोग होणार नाही माहीत आहे मला. पण तरी लिहितेय तुझ्यासाठी. आपण आज २१ व्या जगात जगतोय.  सगळ्या गोष्टीत प्रगती करतोय. फक्त एक गोष्ट सोडून आणि ती म्हणजे न्यायाची. न्यायव्यवस्था  बदलली तरच आपली प्रगती झाली असंच  सर्वांनी म्हणण्याची  हीच ती वेळ. द्या त्या नराधमांना तुम्ही महिलांच्या हाती. रात्रीच्या अंधारात  ते आम्हाला  लक्ष्य करतात तर आम्ही दिवसाच्या उजेडात त्यांना का लक्ष्य करू नये? काढू द्या त्या अपराध्यांच्या इज्जतीचे धिंडवडे. होऊ द्या त्यांनाही अपमानित. नुसती मेणबत्ती पेटवून जस्टिस फॉर निर्भया, जस्टिस फॉर प्रियांका म्हणत बसू नका. 

अशा संवेदनशील प्रकरणांचा  निकाल लवकर लागावा म्हणून तुम्ही सुरुवात केली फास्ट ट्रॅक कोर्टाची. पण एकदा तुम्हीच विचार करा आणि सांगा जनतेला खरंच त्यामुळं प्रमाण कमी झालं का बलात्काराचं? माझ्या किती बहिणींना न्याय मिळाला? असेल तुमच्याकडे त्याचा आकडा तर दाखवा आणि मिळालं का त्यांना त्यांचं पूर्वीचं आयुष्य परत हेही सिद्ध करा. 

आज मी घरातून बाहेर पडते खरी, पण जशी बाहेर पडताना होती तशीच घरी येईल की माझंही जळलेलं शरीरच पाहायला मिळेल प्रियांकासारखं अशी रुखरुख कायम असते माझ्या कुटुंबातील सदस्यांना. जोपर्यंत आपण आपली न्यायव्यवस्था बदलत नाही तोपर्यंत माझ्यासह सगळ्यांना भीतीच्या छायेखाली जगावे लागेल. म्हणून सांगते एखाद्या नराधमाला द्या तुम्ही आमच्या हाती, त्यानंतरच मिळेल प्रियंकाच्या आत्म्याला शांती...

लेखिकेचा संपर्क : ९६७३९२२७९४

बातम्या आणखी आहेत...