आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​चीन : स्नो फेस्टमध्ये साकारली गगनचुंबी इमारतींची नगरी, दोन हजार कलाकारांनी गोठवणाऱ्या तापमानात बनवली हिमशिल्पे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनच्या हार्बिन शहरात बर्फापासून साकारलेल्या या चमचमत्या कलाकृतींचे विश्व मंगळवारपासून सर्वांसाठी खुले झाले आहे. स्नो फेस्टिव्हलच्या निमित्ताने  त्याची सुरुवात झाली. या महोत्सवाला ४ जानेवारीपासून प्रारंभ होणार असून तो फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत चालणार आहे. ईशान्येकडील हेइलाँगजियांगमध्ये दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. केवळ चीनचेच नव्हे, तर जगभरातील पर्यटक या महोत्सवाला हजेरी लावतात. पर्यटकांना या फ्रोझन सिटीचे आकर्षण असते. एखाद्या परिकथेत शोभावे असे हिमशिल्पाचे हे विश्व साकारण्यासाठी ६ लाख चौरस मीटर क्षेत्रफळ एवढी जागा लागली आहे. कलाकारांनी येथील गगनचुंबी शिल्पे उणे २० अंश सेल्सियस तापमानात साकारली. त्यासाठी त्यांना पंधरा दिवसांचा कालावधी लागला. 

 

अर्थव्यवस्थेत १.७२ लाख कोटी रुपयांची पडते भर  
हेइलाँगजियांगचा गारठा प्रांताच्या तिजोरीत भर घालणारा ठरला आहे. किंबहुना येथील अर्थव्यवस्थेसाठी उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन ठरले आहे. सीजीटीएनच्या अहवालानुसार प्रांतास २०१७ मध्ये देश-विदेशातील १२ कोटी पर्यटकांनी भेट दिली होती. त्यातून सुमारे १.७२ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. अर्थात बर्फाने सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या राज्यांत हेइलाँगजियांगला समाविष्ट करून दिले आहे. 

बातम्या आणखी आहेत...