आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅस्पियन समुद्राच्या हवेमुळे काश्मीर, हिमाचलमध्ये हिमवृष्टी; उत्तराखंडातही परिणाम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिमाचल : केलांगमध्ये १८ इंच हिमवृष्टी, काश्मिरात परीक्षा स्थगित, द्रासमध्ये पारा उणे १०.५ अंशावर
  • उत्तराखंडातही परिणाम, पर्यटकांना ७ दिवसांचा अलर्ट

श्रीनगर/ सिमला - जम्म-काश्मीर, हिमाचल प्रदेशात साेमवारी माेठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली. हवामान विभागानुसार कॅस्पियन समुद्रातील हवेमुळे येथे बर्फवृष्टी हाेत आहे. या हवेला पश्चिमी वादळदेखील म्हणतात. आता ही हवामानाची स्थिती डाेंगरांच्या जवळ आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल, उत्तराखंडमध्ये मंगळवारी संध्याकाळपर्यंत बर्फवृष्टी कायम राहू शकते. त्यानंतर हवामानाची ही स्थिती पूर्वच्या दिशेने वाढेल. त्यानंतर १५ जानेवारीला हवामान स्वच्छ हाेण्यास सुरुवात हाेईल.पण उत्तर हिमाचल प्रदेशात हलका पाऊस पडूू शकताे. शिवाय आणखी एक पश्चिमी वादळ १६ जानेवारीला सक्रिय हाेईल. त्यामुळे पहाडावर बर्फवृष्टी हाेऊ शकते. त्यामुळे पर्यटकांनी एक आठवडाभर डाेंगराळ भागातील प्रवास टाळावा. एक पश्चिम वादळ अफगणिस्तान जवळ आहे.

कॅस्पियन समुद्र:


तुर्कमेनिस्तान, कझाकीस्तान, रशिया, अझरबैजान, इराणला लागून असलेला हा समुद्र जगातील सर्वात माेठा समुद्र आहे. त्याचे क्षेत्रफळ ३.७१ लाख चाैरस कि.मी. आहे.

हिमाचल : केलांगमध्ये १८ इंच हिमवृष्टी, काश्मिरात परीक्षा स्थगित, द्रासमध्ये पारा उणे १०.५ अंशावर

  • हिमाचलच्या लाहाेल स्फिती, किन्नाेर, कुुलू, चंबा व मनाली जिल्ह्यात माेठी बर्फवृष्टी झाली. लाहाेल स्फितीतल्या केलांगमध्ये १८ इंच बर्फ पडला. येथील तपमान उणे ६ अंश हाेतेे. राज्यातील हे सर्वात थंड ठिकाण झाले.
  • जम्मू- काश्मीरच्या गुलमर्गमध्ये २७ सेंटिमीटर बर्फ पडला. त्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गही बंद झाला. श्रीनगर - लेह राष्ट्रीय महामार्ग, मुघल राेड ३४ दिवसांपासून बंद आहे. हा रस्ता एप्रिल- मे मध्ये सुरू हाेऊ शकेल.
  • श्रीनगरमध्ये दुसऱ्या दिवशीदेखील विमाने रद्द करावी लागली. काश्मीरच्या क्लस्टर विद्यापीठाने स्थिती सुधारेपर्यंत परिक्षा रद्द केल्या आहेत. लडाखच्या द्रासमध्ये कमी तापमान उणे १०.५ अंश हाेते.