आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Snow On The Summit, Cold Wave In The Plains, Winds In The Bay Of Bengal Increase In Central India

शिखरांवर बर्फ, मैदानी भागात थंडीची लाट, बंगालच्या खाडीतील हवेमुळे मध्य भारतात कडाक्यात वाढ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र हिमाचलातील सिमल्याचे आहे. - Divya Marathi
छायाचित्र हिमाचलातील सिमल्याचे आहे.

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधील अनेक शहरांत गुरुवारी प्रचंड बर्फवृष्टी झाली. बर्फवृष्टीमुळे हिमाचलातील सिमला, कुफरी, नारकंडा, मनाली व डलहौजीमध्ये सुमारे ८८० रस्ते ठप्प झाले आहेत. त्या भागात १ हजाराहून जास्त पर्यटक अडकले. उत्तराखंडच्या नैनीताल, कुमाउं, गागर, रामगड, मुक्तेश्वर, चायनापीक-स्नो-व्ह्यूच्या शिखरावर हिमवृष्टी झाली. येथे १०० हून जास्त वाहने अडकली आहेत. पर्वतांवर सातत्याने हिमवृष्टी होत असल्याने मैदानी राज्यांपैकी पंजाब, हरियाणा, चंदिगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये गुरुवारी थंडीची लाट आणखी तीव्र झाली. पंजाब, हरियाणा, चंदिगड व उत्तर प्रदेशात गुरुवारी ढग दाटले होते. पंजाबच्या अमृतसरमध्ये सर्वाधिक कडाका म्हणजे २.२ अंश तापमान होते. दिल्ली-एनसीआरमध्ये दाट धुके होते, परंतु हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. मध्य भारतात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. त्यामागे तेलंगण ते उत्तर प्रदेशापर्यंतचा पट्टा कारण असून बंगालच्या खाडीत आर्द्रयुक्त हवेमुळे थंडीचा कडाका वाढला. चोवीस तासांत आेडिशा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. पंजाब, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, चंदिगडमध्ये थंडीची लाट राहू शकते.