आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिमला / श्रीनगर/ नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश व जम्मू-काश्मीरच्या प्रमुख पर्यटन स्थळांवर शनिवारी प्रचंड बर्फवृष्टी झाली. हवामान विभागानुसार हिमाचल प्रदेशात गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक २४ इंच बर्फवृष्टी डलहौसी येथे झाली. त्यानंतर कुफरीमध्ये ८ इंच, मनालीत ४ इंच, तर सिमल्यात ३ इंच बर्फवृष्टी झाली. राज्यास मुसळधार पाऊस व बर्फवृष्टीमुळे २० आमदार विधानसभेत वेळेवर पोहचू शकले नाहीत. त्यामुळे विधानसभेचे कामकाज अर्ध्या तास विलंबाने सुरू झाले. हसन वॅली, कुफरी, फागू, नारकंडामध्ये अडकलेल्या १७० विद्यार्थी, पर्यटकांना सुरक्षितपणे काढण्यात आले. पर्यटनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९० महाराष्ट्रातील आहेत. अजूनही ३०० गाड्या अडकलेल्या आहेत. हिमाचलमध्ये सर्वात नीचांकी तापमान उणे ५.७ अंश केलांगमध्ये नोंदवण्यात आले. धर्मशाला येथे सर्वात जास्त ८६ मिमी पावसाची नोंद झाली.
सात दिवसांनंतर विमानसेवा पूर्ववत
धुक्यामुळे खंडित झालेली श्रीनगरमधील विमान सेवा शनिवारी पूर्ववत झाली. परंतु, जम्मूहून वैष्णोदेवीसाठी हेलिकॉप्टर सेवा ३ दिवस बंद राहील. लदाख भागातील द्रासचे तापमान उणे ११ होते. मैदानी भागात राजस्थानच्या सिकर शहरात शनिवारी सर्वाधिक थंडी होती. तापमान ४ अंशांवर होते.
५ राज्यांत धुक्यात वाढ शक्य
हवामान संस्थेकडून आगामी चोवीस तासांत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्रासह १५ राज्यांत मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दिल्लीसह ५ राज्यांत धुके आणखी वाढू शकते. उत्तर भारतात तापमान २-३ अंशांनी कमी होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.