आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली : देशभरात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. उत्तराखंड ते हिमाचल व लेह-लडाखमध्ये प्रचंड बर्फवृष्टी सुरू झाली आहे. काश्मीर व दक्षिणेतील काही काही भागांत जोरदार पाऊस झाला. उत्तराखंडच्या केदारनाथ धाम येथे मंगळवारी रात्रीपासून बर्फवृष्टी सुरू होती. त्यामुळे दोन फूट बर्फ साठला. बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, हेमकुंड साहिबसह गढवाल व कुमाऊंमध्ये सलग दुसऱ्या दिवशी बर्फवृष्टी होईल. हिमाचलच्या किनौरमध्ये ३ फुटांपर्यंत बर्फ साठल्याने तापमान शून्याहून नीचांकी गेले आहे. रोहतांग खिंडीतील वाहतूक बंद करण्यात आली आहे. लाहौल स्पितीमध्ये बर्फवृष्टीमुळे प्रशासनाने पर्यटकांना प्रवेश करण्यास मनाई केली आहे. बर्फवृष्टीमुळे शाळांना सुटी देण्यात आली आहे.
- बद्रीनाथ-केदारनाथ व चमोलीत दोन-तीन फूट बर्फ
- हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे शाळांना सुटी जाहीर
- दक्षिण भारताच्या तामिळनाडूसह अनेक राज्यांत पाऊस सुरू
- हरियाणाच्या रोहतकमध्ये मुसळधार पाऊस, गाराही पडल्या
श्रीनगर-लेह राजमार्ग बंद
बुधवारी सकाळपासून बर्फवृष्टी सुरू असून श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग पुन्हा बंद झाला होता. श्रीनगरमध्ये पाऊसही झाला. सातत्याने बर्फवृष्टी होत असल्याने नियंत्रण रेषेजवळील माछिल, गुरेजचा रस्तेमार्गाचा संपर्क तुटला आहे. पश्चिमेकडील वारे व चक्री वादळामुळे यंदा जम्मू-काश्मीर व लडाख येथे नोव्हेंबरमध्ये प्रचंड बर्फ कोसळला. १९५९ नंतर नोव्हेंबरमध्ये काश्मीर खोऱ्यात झालेली ही सर्वाधिक बर्फवृष्टी व पाऊस ठरला आहे. दक्षिण राज्ये पावसामुळे त्रस्त झाले .
पुढे काय
पश्चिम-मध्य यूपीत पावसाची शक्यता, काश्मीर व हिमाचलमध्ये हिमवर्षाव सुरूच राहील
स्कायमेटनुसार ताज्या पश्चिम विक्षोभने जम्मू आणि काश्मीरची दिशा धरली . यामुळे उत्तरेकडे हवेचे चक्रीवादळ तयार झाले. यामुळे यूपीतील पश्चिम,मध्य भागात पावसाची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. पुढील २४ तासांत जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडाच्या उत्तर भागात पाऊस आणि हिमवर्षावाची शक्यता आहे. हिमाचलमध्ये पर्यटकांना पहाडी भागात जाण्याआधी स्थितीची माहिती घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने गुरुवारी ओडिशा, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
हिमाचल : बर्फवृष्टीने सर्व मार्ग बंद
छायाचित्र हिमाचलच्या किनौर जिल्ह्यातील रिकाँग पिआेचे आहे. बर्फवृष्टीमुळे वाहने, घरांवर बर्फच बर्फ पसरलेला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.