खोऱ्यात हिमवर्षाव / श्रीनगरचा लाल चौक झाला शुभ्रधवल... जम्मू-काश्मीरच्या १० शहरांत बर्फवृष्टी

छायाचित्र श्रीनगरच्या लाल चौकाचे आहे. बर्फवृष्टीमुळे शहरात थंडी वाढली आहे. छायाचित्र श्रीनगरच्या लाल चौकाचे आहे. बर्फवृष्टीमुळे शहरात थंडी वाढली आहे.

महामार्गावर २ हजार वाहने अडकली, सर्व उड्डाणे रद्द 
 

Nov 08,2019 09:28:00 AM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर व राजौरीसह १० शहरांत गुरुवारी प्रचंड बर्फवृष्टी झाली. श्रीनगरमध्ये सुमारे ६ इंच बर्फ पडला. त्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करावा लागला. या मार्गावर सुमारे २ हजार वाहने अडकून पडली आहेत. त्याशिवाय गुरेज, माछिल, केरन, तंगधार इत्यादी दुर्गम भागांना श्रीनगरशी जोडणारे मार्गही बंद होते. श्रीनगरमधील विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. या भागातील ३७ वीज केंद्रांतून सुमारे १० तास वीजपुरवठा खंडित होता. श्रीनगरचे उपायुक्त शाहिद इक्बाल चौधरी यांच्या म्हणण्यानुसार बर्फ हटवण्यासाठी ४५ यंत्रांचा वापर केला जात आहे. पंपांवर जनरेटर लावले आहेत. पाणी काढण्याचे काम सुरू आहे. हवामान विभागाच्या मते श्रीनगरमध्ये किमान तापमान उणे ०.६ अंश नोंदवण्यात आले. हिमाचल प्रदेशातील मनाली, सिरमाैर, उत्तराखंडमधील बद्रीनाथमध्ये बर्फवृष्टी झाली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

X
छायाचित्र श्रीनगरच्या लाल चौकाचे आहे. बर्फवृष्टीमुळे शहरात थंडी वाढली आहे.छायाचित्र श्रीनगरच्या लाल चौकाचे आहे. बर्फवृष्टीमुळे शहरात थंडी वाढली आहे.