आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी सलग सुरूच; दीर्घ खंडानंतर वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशात सतत बर्फवृष्टी सुरूच असून ५-८ फेब्रुवारीपर्यंत राज्यात पाऊस होण्याची शक्यता भारतीयह हवामान विज्ञान विभागाचे संचालक मनमोहन सिंह यांनी व्यक्त केली आहे. सिंह म्हणाले, जानेवारी व फेब्रुवारीमध्ये हिमालय क्षेत्रात प्रत्येक महिन्यात सरासरी पाच पश्चिम विक्षोम सक्रिय होतात. एका दीर्घ खंडानंतर या वेळी राज्यात पश्चिम विक्षोम (वेस्टर्न डिस्टर्बन्स) एकानंतर एक सक्रिय आहे. 


पश्चिम विक्षोम भूमध्य सागरात निर्माण होणाऱ्या एका वादळ प्रणालीसाठी वापरल्या जाणारा हवामानाशी संबंधित शब्द आहे. यामुळे भारतीय उपखंडाच्या ईशान्य क्षेत्रात पाऊस किंवा बर्फवृष्टीसाठी कारण ठरतो. गेल्या हिवाळ्यात राज्यात दुष्काळासारखी स्थिती निर्माण झाली होती. यामुळे राज्यातील ७ हजार कोटी रुपयांच्या फळ अर्थव्यवस्थेला फटका बसला. विशेष सफरचंद आधारित अर्थव्यवस्था व पर्यटनावर परिणाम झाला. बर्फवृष्टीत पर्यटक आकर्षित होतात. सफरचंदांच्या बागेसाठी सर्वसाधारणपणे डिसेंबर व जानेवारीमध्ये कमी थंडीची आवश्यकता असते. साधारण दोन दशकानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याचे सिमल्यातील लोकांचे म्हणणे आहे. गेल्या १५ दिवसांत मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली. 


उन्हाळ्यात पाणीटंचाई कमी होण्याचा अंदाज व्यक्त 
सन १९४० च्या दशकाच्या सुरुवातीपासून सिमल्यात वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी हरी सूद म्हणाले, गेल्या दोन दशकांत बर्फवृष्टीत घट दिसून आली. या हिवाळ्यात दीर्घ कालावधीनंतर अशी बर्फवृष्टी झाली. यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई कमी होण्यास मदत मिळेल. ८० वर्षीय जयसिंह ठाकूर म्हणाले, या हिवाळ्याने कडाक्याच्या थंडीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. 


२००८-०९ स्कीइंगसाठी वाईट वर्ष मनालीपासून १३ किमी अंतरावरील सोलंग स्की उतारावर अनेकदा पुरेशी हिमवृष्टी झाली नाही. त्यामुळे स्कीइंगच्या व्यवसायाशी संबंधित लोक उंच डोंगरावर जाण्याची योजना आखत आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, २००८-०९ स्कीइंगसाठी वाईट होते. या वर्षंातील हिवाळ्यात पर्वतावर खूप कमी व अनियमित बर्फवृष्टी झाली होती. 
 

बातम्या आणखी आहेत...