आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर-श्रीनगरमध्ये झाली चिल्लई कलाच्या अखेरच्या दिवशीही बर्फवृष्टी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी बर्फवृष्टी व पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. काश्मीरमध्ये ४० दिवसांच्या चिल्लई कलाच्या अखेरच्या दिवशीही बर्फवृष्टी झाली. त्यामुळे थंडीत वाढ झाली. ३० दिवसांपासून बंद असलेला जम्मू-काश्मीर राष्ट्रीय महामार्ग सुरू करण्यात आला होता. नड्डी तलाव गोठला होता. वैष्णोदेवी मंदिर असलेल्या रियासी जिल्ह्यात चोवीस तासांत ३२.९ मिमी पाऊस झाला.

हिमाचलच्या धर्मशाला जिल्ह्यातील गलू, मॅक्लोडगंजमध्ये प्रचंड बर्फवृष्टी झाली. गलूमध्ये सर्वाधिक २ फूट बर्फ साचला. हवामान विभागाच्या मते, जानेवारीत आतापर्यंत वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय राहिले आहेत. त्यामुळे शिखरांवर बर्फवृष्टी, पाऊस होत आहे. भारतीय उपखंडाच्या उत्तरेकडील भागात थंडीत येणाऱ्या वादळाला हवामानाच्या व्यवस्थेला वेस्टर्न डिस्टर्बन्स कारणीभूत ठरतो. त्या माध्यमातून भूमध्य सागरासह अनेक सागरांतून आर्द्रता आणून बर्फवृष्टी व पाऊस कोसळतो.

मैदानी राज्य : चंदिगडमध्ये सर्वाधिक कडाका, सहा राज्यांत मध्यम पाऊस

हवामान विभागाच्या मते बुधवारी देशाच्या मैदानी भागात सर्वाधिक थंड प्रदेश म्हणून पंजाब व चंदिगडचा उल्लेख करावा लागेल. येथे किमान तापमान १.० अंश सेल्सियस होते. सर्वाधित गारठलेल्या शहरांत हरियाणा, राजस्थान व गुजरातमधील शहरांचा समावेश आहे. गेल्या चोवीस तासांत उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालच्या पूर्वेकडील भागात तुरळक ते मध्य स्वरूपात पावसाची नोंद झाली. आेडिशातही काही ठिकाणी पाऊस झाला.

पुढे काय : दोन दिवसांत लडाख, उत्तराखंड येथे बर्फवृष्टी, दिल्लीत कडाका वाढ शक्य

दोन दिवसांत जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी व पाऊस होऊ शकतो. उत्तर भारतात तापमान आणखी कमी होऊ शकते. दिल्लीत कडाक्याच्या थंडीत वाढ होऊ शकते. उत्तर-पश्चिम भारतातील शहरांतही थंडी परतणार आहे. गंगेच्या मैदानी भागांतील स्थितीमुळे पूर्वेकडील राज्यांतील हवामानात बदल झाला आहे. पूर्वोत्तर प्रदेश, पश्चिम बिहारमध्ये बुधवारी देखील पावसाची शक्यता आहे.

छायाचित्रे श्रीनगरची आहेत

बातम्या आणखी आहेत...