आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यूयॉर्क - अमेरिका व कॅनडाच्या सीमेलगत असलेल्या ग्रेट लेक्स भागाला बर्फाच्या वादळाचा फटका बसला. त्यामुळे तेथील 3.5 कोटी लोकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. तसेच खराब हवामानामुळे 1600 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यातही पाच हजारांहून अधिक विमानांच्या उड्डाणास विलंब झाला. शिकागोच्या 'ओ' हरे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वाधिक 770, कन्सास सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 187 आणि शिकागोतील मिडवे विमानतळावरील 124 उड्डाणे रद्द झाली आहेत.
याबाबत माहिती देताना कन्सासचे राज्यपाल जेफ कॉल्यर यांनी सांगितले की, खराब हवामानामुळे अनेक ठिकाणी स्थिती नियंत्रणाबाहेर आहे. रस्ते आणि महामार्गांवर 6 ते 10 इंचांपर्यंत बर्फ जमल्याने वाहतूक ठप्प आहे. परिणामी आणीबाणी लागू करण्यात आली. तसेच वादळात अडकू नये म्हणून नागरिकांना प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 56 किमी प्रतितास वेगाने आलेल्या या वादळासह बर्फवृष्टी झाल्याने कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. अनेक भागांत उणे 10 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नेब्रास्कात बर्फवृष्टीमुळे झालेल्या अपघातात 6 जण जखमी आहेत.
हायवेवर वाहनांच्या 10 किमी लांब रांगा
कन्सास, मिसुरी, नेब्रास्का व इआओेवाची लोकसंख्या 1.4 कोटी. कॅनडाचा समावेश केल्यास या वादळामुळे 3.4 कोटी लोकांवर गंभीर परिणाम झाला आहे. कन्सास ते मिसुरी महामार्ग बंद केल्याने 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या.
67 हजार घरांचा वीजपुरवठा खंडित
तुफान बर्फवृष्टीमुळे 67 हजार घरांचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. सोमवारी बर्फाचे हे वादळ पूर्वोत्तर भागाकडे सरकले. कन्सास, सेंट्रल मिसुरी, दक्षिण-पूर्व नेब्रास्कात बर्फवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शिकागो विमानतळावर 3 इंच बर्फ साचल्याने विमानांची चाके जागीच थबकली आहेत.
कॅनडा: कॅल्गरीत 76 वर्षांचा विक्रम मोडीत
कॅनडाच्या कॅल्गरीत नोव्हेंबरमधील बर्फवृष्टीने 76 वर्षांचा विक्रम मोडला. तेथे 5.28 इंच बर्फवृष्टी झाली. यापूर्वी 1942 मध्ये तेथे 3.76 इंच बर्फवृष्टी झाली होती. कॅल्गरीत या महिन्यात सरासरीपेक्षा दुप्पट बर्फवृष्टी झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.