crime / शासकीय कार्यालये की मद्यपींचे अड्डे 

कलेक्टर कचेरी परिसरात पार्किंग; स्वच्छतागृहात आढळल्या दारूच्या बाटल्या 

दिव्य मराठी

Aug 19,2019 11:58:00 AM IST

अकोला : शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व इतर मोठ्या शासकीय कार्यालयांमध्ये ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या आढळत असल्याने कार्यालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे कधी लक्ष देतील हा प्रश्न आहे.

जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये विविध शासकीय कार्यालयांमध्ये दिवसभर नागरिकांची वर्दळ असते. मात्र, अंधार पडताच कार्यालयांतील आडोशाचे पाहून दारुडे बाटल्या रिचवून मोकळे होतात. त्यामुळे कार्यालयांचा दर्शनी भाग चकचकीत दिसत असला तरी पार्किंग, स्वच्छतागृहे व आडोशाच्या ठिकाणी दारू आणि पाण्याच्या रिकाम्या बाटल्या सर्रासपणे दिसून येतात. त्यामुळे मोकाट जनावरे, कुत्र्यांचा वावर, तुंबलेलीच डबकी, विखुरलेला कचरा ही अनेक कार्यालयांची ओळख बनली असून, त्यात भर म्हणजे कार्यालये आता दारुड्यांचे अड्डे होताना दिसत आहेत. त्यामुळे तळीरामांचे वचक बसवून कार्यालयांचा परिसर कधी स्वच्छ होईल हा प्रश्न आहे. सार्वजनिक सुटीच्या दिवशी अनेक जण शासकीय कार्यालयांमध्ये वावरतात. मात्र, आपले काम काय ? कोठून, कशासाठी आलात ? अशी साधी विचारणाही कुणी करत नाही. त्यामुळे सुटीच्या दिवशी कुणीही या काहीही करा अशी स्थिती निर्माण झाली आहे.

X