politics / पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात तक्रारकर्त्यांची लागली मोठी रिघ 

जनता दरबारात जनतेची गाऱ्हाणी ऐकूण घेताना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील. शेजारी जिल्हािधकारी जितेंद्र पापळकर, जि.प.चे सीइओ आयुष प्रसाद, मनपा आयुक्त संजय कापडणीस, पोलिस अधीक्षक अमोघ गावकर.  जनता दरबारात जनतेची गाऱ्हाणी ऐकूण घेताना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील. शेजारी जिल्हािधकारी जितेंद्र पापळकर, जि.प.चे सीइओ आयुष प्रसाद, मनपा आयुक्त संजय कापडणीस, पोलिस अधीक्षक अमोघ गावकर. 

२२८ तक्रारी प्राप्त पंधरा दिवसांत समस्या सोडवण्याचे आवाहन 

दिव्य मराठी

Aug 20,2019 12:05:00 PM IST

अकोला : दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी होणारा जनता दरबार आज, १९ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात भरवण्यात आला. यावेळी तक्रारकर्त्यांची अक्षरश: रिघ लागली होती. आजच्या कामकाजादरम्यान तब्बल २२८ तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींचे निराकरण आगामी १५ दिवसांत करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले आहे.

प्रारंभी पालकमंत्री महोदयांनी थेट नागरिकांपर्यंत पोहोचून नव्या तक्रारी स्वीकारल्या. त्यानंतर विभागनिहाय सुनावणी घेत तक्रारदारांचे समाधान केले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त संजय कापडणीस, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, त्यानंतर झालेले िवधीमंडळाचे अधिवेशन, अलिकडे मुख्यमंत्री महोदयांनी काढलेली महाजनादेश यात्रा आदी कारणांमुळे जनता दरबारची कारवाई अनियमित झाली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांत तुंबून असलेल्या सर्व तक्रारी आजच्या कामकाजादरम्यान पटलावर आल्या. नेहमीप्रमाणे जुन्या तक्रारदारांना थेट प्रवेश देत नव्या तक्रारदारांची रितसर नोंद घेत त्यांना टोकन क्रमांक देण्यात आला. त्यानंतर महापालिका, जिल्हा परिषद, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग अशी खातेनिहाय सुनावणी करण्यात आली.

आजच्या कामकाजादरम्यान प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक ७३ तक्रारी महसूल विभागाच्या आहेत. त्यापेक्षा कमी ५३ तक्रारी जिल्हा परिषदेच्या तर ३१ महापालिकेच्या कामकाजाबाबतच्या आहेत. पोलीस विभागाच्या १७, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या ९, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या ६, जिल्हा अग्रणी बँक, वीज वितरण कंपनी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रत्येकी पाच, राज्य परिवहन महामंडळ, सहायक आयुक्त कामगार कल्याण, जिल्हा विपणन अधिकारी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेशी संबंधित प्रत्येकी दोन तर जिल्हा शल्य चिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पाटबंधारे विभाग, आयटीआय, टपाल विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, सहाय्यक संचालक नगररचना आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाशी संबंधित प्रत्येकी एका तक्रारीचा समावेश आहे. संबंधित विभागांनी या तक्रारी येत्या १५ दिवसांत सोडवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पाटील यांनी यावेळी संबंधितांना दिले.

मनपाबाबत नाराजीचा सूर
महापालिकेबाबतच्या काही तक्रारी वारंवार जनता दरबारात पोहोचतात. त्यामुळे कामकाजादरम्यान पालकमंत्र्यांनी काही अधिकाऱ्यांची कान-उघाडणी केली. जलशुद्धीकरण केंद्रावर कार्यरत एका कर्मचाऱ्याच्या वेतनातील तफावत, अॅप्रोच रोडच्या कामांतील दिरंगाई, सिमेंट क्राँक्रिटचा रस्ता असतानाही एका आमदाराच्या घरासमोर मुरुमाचा रस्ता दाखवून केलेली बोगस कामे या त्यातील ठळक बाबी होत्या.

X
जनता दरबारात जनतेची गाऱ्हाणी ऐकूण घेताना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील. शेजारी जिल्हािधकारी जितेंद्र पापळकर, जि.प.चे सीइओ आयुष प्रसाद, मनपा आयुक्त संजय कापडणीस, पोलिस अधीक्षक अमोघ गावकर. जनता दरबारात जनतेची गाऱ्हाणी ऐकूण घेताना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील. शेजारी जिल्हािधकारी जितेंद्र पापळकर, जि.प.चे सीइओ आयुष प्रसाद, मनपा आयुक्त संजय कापडणीस, पोलिस अधीक्षक अमोघ गावकर.