आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे वयाच्या 84 व्या वर्षी प्रदीर्घ आजारानंतर निधन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले आहे. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. उपचार सुरू असतानाच पुण्यातील एका खासगी रुग्णालयात गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. येथील प्रभात रोड परिसरातील निवासस्थानी विद्या बाळ यांचे पार्थिव संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. तर संध्याकाळी 5.30 वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.

राज्यातील अनेक सामाजिक चळवळींमध्ये विद्याताई सक्रीय राहिल्या. केवळ सामाजिक कार्यकर्ताच नव्हे, तर एक उत्तम लेखिका आणि संपादक म्हणून त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाळली. 1981 मध्ये त्यांनी 'नारी समता मंच' या संस्थेची स्थापना केली. ग्रामीण स्त्रियांमध्ये आत्मभान जागृत करणाऱ्या 'ग्रोइंग टुगेदर' या प्रकल्पाच्या प्रकल्प-प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. विद्या बाळ यांनी दोन अनुवादित आणि एक रुपांतरित कादंबरी लिहिली आहे.

1982 मध्ये दोन स्त्रियांचे खून झाले. त्यावेळी विद्या बाळ यांच्या 'नारी समता मंच' या संघटनेने गावोगावी जाऊन वाहत्या रस्त्यांवर 'मी एक मंजुश्री' नावाचं प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनाने अख्खा महाराष्ट्रच ढवळून निघाला. स्त्रियांना बोलण्यासाठी काही जागा हवी. म्हणून मग विद्या बाळ यांच्या संघटनेने 'बोलते व्हा' नावाचे केंद्र सुरू केले. पुरुषांनाही याची गरज होती. त्यातून 2008 मध्ये 'पुरुष संवाद केंद्र' सुरू केले. विद्या बाळ यांनी पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून दोन वर्षे काम केलं. त्यानंतर, 1964 ते 1983 या काळात 'स्त्री' मासिकाच्या त्या साहाय्यक-संपादक झाल्या आणि 1983 ते 1986 या काळात मुख्य संपादक.  त्यानंतर त्यांनी ऑगस्ट 1989 मध्ये 'मिळून साऱ्याजणी' हे मासिक सुरू केले.

बातम्या आणखी आहेत...