आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
नवी दिल्ली- आजच्या काळात असा कोणी नाही जो सोशल मिडियावर अॅक्टीव्ह नसेल. एक व्यक्ती अंदाजे दिवसातील एक तास सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असतो. तुम्ही या तासात सोशल मिडियावरून कमाई करू शकता. आजकाल सगळे ब्रँड्स आपल्या प्रोडक्टचे सोशल मिडियावर प्रमोशन करत असतात. कारण सोशल मिडियावर यूथ सोबत कनेक्ट करणे सोपे आहे. कंपनी आपल्या प्रोडक्ट्सच्या प्रमोशनसाठी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर हायर करते. त्यात तुम्हीही Social Media Influencer बनून लाखों रुपयांची कमाई करू शकता.
कसे बनाल इन्फ्लुएंसर बनना
जर तुम्ही फेसबुक, इंस्टाग्रामवर अॅक्टिव असाल आणि तुमचे काही फोलोवर्स असतील तर तुम्ही सोप्या पद्धतीने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बनू शकता. यासाठी तुम्ही कंपनी किंवा ब्रँड्ससोबत कनेक्ट करुन, सोशल मीडियावर त्यांचे प्रोडक्ट एंडोर्स करावे लागतील. दिल्लीत राहणारे लोकेन्द्र सिंह राणावत याच प्रकारे ब्रांड्स एंडोर्स करून महिना लाख ते दिड लाख कमाई करत आहेत. Mr. Ranawat नावाने त्यांनी पाच वर्षापासून इंस्टाग्रामवर पोस्ट टाकने सुरू केले होते आणि त्यांचे एक लाखांपेक्षा जास्त फलोअर्स आहेत. ते www.indiangentlemen.com नावाचा ब्लॉगही पब्लिश करतात ज्यात ते ब्रँड्ससाठी कंटेट लिहीतात.
मार्केटमध्ये आहे डिमांड
या डिझिटल इंडीयामध्ये जवळ-जवळ सर्वच कंपन्या सोशल मिडियावर आपल्या ब्रँड्सचे प्रमोशन करत आहेत. त्यामुळे कंपन्या अशा लोकांच्या शोधात असतात जे चांगला कंटेट लिहू शकतात. यात कंपनी लाखो रूपये कंपनी पे करते.
आपल्या आवडीला बनवू शकता प्रोफेशन
जर तुम्हाला लोकप्रिय व्यायचे असेल आणि पैसे कमावायचे असेल तर हे क्षेत्र तुमच्यासाठीच आहे. यात तुम्ही पार्ट टाइम काम करूनही कमाई करू शकता. सुरुवातीला ब्रँड प्रमोशन आणि कंटेट राइटिंगकरून या कामाला नंतर एक फुलटाइम प्रोफेशन बनवू शकता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.