आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडिया ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत विकास कामांवर लक्ष देण्याची गरज - आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • आश्वासने पूर्ण न करणारे आता सत्तेबाहेर, त्यांची अवस्था आपण समजून घ्यायला हवी - युवासेनाप्रमुख

मुंबई - सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून विकास कामांकडे लक्ष देण्याच गरज असल्याचे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. पुढे बोलतांना त्यांनी आपली आश्वासने पूर्ण न करणारे आता सत्तेत नाहीत. यामुळे आपण त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्यात असे म्हणत भाजपला टोला लगावला आहे. 
 ठाकरे आडनाव लावल्याने कोणी ठाकरे होत नाही - अमृता फडणवीस

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी 15 डिसेंबर रोजी कारवाई केली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई जालियनवाला बागेची आठवण करून देत असल्याचे म्हणाले होते. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या पत्नी अमृता फडणीवस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. 


अमृता फडणीवस यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "ठाकरे आडनाव लावल्याने कोणी ठाकरे होत नाही. त्यासाठी खरे आणि तत्वनिष्ठ असले पाहिजे तसेच त्यांनी स्वतःच्या कुटूंब आणि सत्तेच्या गतीशीलतेपेक्षा लोक आणि पक्षाच्या सदस्यांच्या भल्यासाठी विचार करायला हवा."शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी अमृता फडणीवस यांच्या या ट्विटरचा निषेध केला होता. यानंतर अमृता यांनी दुसरे एक ट्विट करत "तुम्ही लोकांच्या डोक्यावर मारून त्यांचे नेतृत्व करू शकत नाहीत. हे नेतृत्व नसून एकप्रकारचा हल्ला आहे."आश्वासने पूर्ण न करणारे सत्तेबाहेर, त्यांची अवस्था समजून घ्यायला हवी - युवासेनाप्रमुख

भाजप नेत्यांकडून सोशल मीडियावर होत असलेल्या टीकेला उत्तर देत आदित्य ठाकरे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "सोशल मीडिया ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करून विकास कामांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ज्यांनी आश्वासने पूर्ण केली नाहीत ते आता सत्तेत नाहीत. यामुळे त्यांची अवस्था आपण समजून घ्यायला हवी."
 

बातम्या आणखी आहेत...