आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Social Media Users Reaction On PM Narendra Modi Tweet Photos Of Him Watching Solar Eclipse

पीएम मोदींनी ग्रहण पाहण्यासाठी घातला तब्बल दीड लाखांचा गॉगल, सोशल मीडियावर येत आहेत प्रतिक्रिया

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडिया डेस्क - दिल्ली, तमिळनाडू आणि केरळसह देशातील अनेक राज्यात गुरुवारी सकाळी सूर्यग्रहण दिसले. सकाळी 8:04 वाजता सुरू झाल होते. भारतात ग्रहणाचा कालावधी 2 तास 52 मिनिटे राहिला. सामान्य नागरिकांप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील वर्षातील शेवटेच ग्रहण पाहण्यास उत्साहित होते. याबाबत मोदींनी ट्वीट करत लिहिले की, इतर भारतीयांप्रमाणे मी देखील #solareclipse2019 पाहण्यासाठई उत्साहित होतो. परंतु नंतर ढगाळ वातावरणामुळे पाहता आले नाही. मात्र मी लाइव स्ट्रीमद्वारे कोझिकोड (केरळ) येथून ग्रहण पाहिले. 

पीएम मोदींच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अनेक लोक त्यांच्या फोटोवर मीम्स बनवत आहेत. तर काही युझर्स त्यांच्या चश्म्याची किंमत शोधत आहेत आणि खालील वेबसाइटची लिंक शेअर करत आहेत.  https://www.goodseeco.com/products/maybach-eyewear-the-diplomat-i  

युजरची टीका - तुम्ही जर जर्मन स्वप्ने जगत असाल तर ते जर्मन चष्म्यातून पाहा...

  • ट्विटरवरील एक युजर @RoflGandhi_ने लिहिले की, तुम्ही जर जर्मन स्वप्न जगत असाल तर ते जर्मन चष्म्यातून पाहा. किंमत 1.6 लाख. यावेळी युजरने ब्रांडेडफकीर असा हॅशटॅग वापरला.
  • युजरने तीन फोटो शेअर केले. पहिल्या फोटोत पीएम मोदी चष्म्यातून आकाशाकडे पाहताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत युजरने चष्म्यावरील मेबॅक कंपनीचा लोगो दाखवला. तिसऱ्या फोटोत मेबॅकची किंमत दाखवण्यात आली. ही जवळपास 2159 डॉलर (1 लाख 53 हजार रूपये) असल्याचे सांगितले जात आहे.