Home | Khabrein Jara Hat Ke | Social worker leaves $11 million estate to children's charities upon death

47.5 लाख रुपये वर्षांला कमवायचा हा व्यक्ती, तरीही खुप कंजूसीपणे जगायचा आयुष्य, फाटक्या शूजलाही टेप लावून घालायचा 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 11, 2019, 04:06 PM IST

अचानक झाला व्यक्तीचा मृत्यू आणि समोर आले एक शॉकिंग सत्य 

 • Social worker leaves $11 million estate to children's charities upon death

  वाशिंगटन. गेल्या महिन्यात अमेरिकेत एका सोशल वर्करचा मृत्यू झाला आणि सर्वच हादरले. ही व्यक्ती खुप कंजूस होती आणि आयुष्यभर एकटीच राहत होती. त्यांनी लग्नही केले नव्हते आणि त्यांना कुटूंबतही नव्हते. त्याची विचित्र लाइफस्टाइल बघून सर्व त्यांची खिल्ली उडवायचे. पण वयाच्या 63 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांच्यासंबंधीत एक गोष्ट समोर आली, ही जाणून सर्वच हैराण झाले होते.


  दान करुन गेला 77 कोटींची प्रॉपर्टी...

 • Social worker leaves $11 million estate to children's charities upon death

  - अमेरिकेच्या वाशिंगटन शहरात राहणा-या एलेन नैमन यांचा मृत्यू डिसेंबर 2018 मध्ये झाला. कँसरमुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर लोक हैराण झाले. कारण त्यांनी गरीब मुलांसाठी 11 मिलियन डॉलर (जवळपास 77 कोटीं रु.) ची प्रॉपर्टी दान केली होती. 
  - एलेन आपल्या कंजूसीसाठी खुप जास्त प्रसिध्द होते. ते वर्षांचे जवळपास 47.5 लाख रुपये कमावायचे. पण यानंतरही स्वतःवर किंवा कुणावरही खर्च करायचे नाही. ते आयुष्यभर एकटे राहिले, त्यांनी लग्न केले नव्हते आणि मुलांना दत्तकही घेतले नव्हते. 
  - ते पैशांविषयी एवढे कंजूस होते की, बुट फाटल्यानंतरही ते त्याला टेप लावून घालायचे. यामुळे त्यांना नवीन शूज खरेदी करावे लागायचे नाही. त्यांना एकटे राहणे आवडायचे. ते समाजसेवा करायचे, पण तरीही त्यांना लोकांसोबत जास्त मिक्स होऊन आवडायचे नाही. 
  - एलेनविषयी जास्तीत जास्त लोकांना काहीच माहिती नव्हते. जे लोक त्यांना ओळखायचे, त्यांना माहिती नव्हते की, त्यांनी एवढे मोठे रहस्य लपवून ठेवले आहे. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी केलेल्या एका दानाविषयी माहिती मिळाली.


   

 • Social worker leaves $11 million estate to children's charities upon death

  आयुष्यभर दूस-यांसाठी जगले जिया एलेन 


  - एलेनच्या मृत्यूनंतर लोकांना कळाले की, त्यांनी आयुष्यभर स्वतःवर पैसा खर्च केला नसला तरी ते अजिबात कंजूस नव्हते. ते गेले तेव्हा त्यांनी त्यांची 11 मिलियन डॉलर (77 कोटी रु) प्रॉपर्टी अनाथ, गरीब, आजारी, बेवारस आणे एकट्या लोकांसाठी दान केली होती.
  - त्यांनी हे पैसे फक्त एका नोकरीमधून कमावले नव्हते, तर अनेक वेळा त्यांनी एकाच वेळी तीन-तीन नोक-याही केल्या होत्या. त्यांच्या एका मित्रानुसार पालकांच्या मृत्यूनंतरही त्यांना वारस म्हणून खुप पैसा मिळाला होता. यासोबतच त्यांनी त्याच्या पैशांची गुंतवणूक केली होती, हे पैसे सतत वाढत होते. 
  - एलेनचा एक मोठा भाऊ होता, तो मानसिकरित्या कमजोर होता, त्याची देखरेख करण्याची जबाबदारीही एलेनवर होती. यासोबतच सोशल सर्विसदरम्यान एलेन गरीब मुलांचे अडचणींने भरलेले आयुष्य बघायचे तेव्हा ते खुप दुःखी व्हायचे. 
  - एलेन कधीच कुणाला त्यांच्या मनातील गोष्ट सांगायचे नाही, पण त्यांना आपला भाऊ आणि गरीब मुलांचे दुःख पाहून खुप वाईट वाटायचे. यामुळे त्यांनी विचार केला होता की, ते सर्व प्रॉपर्टी गरीब आणि बेवारस मुलांसाठी सोडून जातील. 
  - व्यक्तीच्या मृत्यूनंतर समजले की, त्यांनी सर्व प्रॉपर्टी वेगवेगळ्या फील्डशी संबंधीत असलेल्या संस्थांसाठी दान केली होती. यामध्ये अनाथालय, हॉस्पिटल्स, वृध्दाश्रमसारख्या संस्था होत्या. मुलांच्या एका हॉस्पिटलला त्यांनी 2.5 मिलियन डॉलर(17.5 कोटी) दान केले होते. या हॉस्पिटलला मिळालेले हे सर्वात मोठे दान होते.
  - एलेन ज्या-ज्या संस्थांना दान देऊन गेला होता, त्यांच्यासोबत त्यांचे जवळचे नाते नव्हते. ते त्यांना ओळखतही नव्हते. एलेन आयुष्यभर दूस-यांसाठी जगले आणि दूस-यांसाठी पैसे सोडून गेले. 

Trending