आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मेलबर्न- अमेरिकेची २१ वर्षीय साेफिया केनिनने करिअरमध्ये पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमचा किताब पटकावला. तिने सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम अाॅस्ट्रेलियन अाेपन टेनिस स्पर्धेचा महिला एकेरीचा किताब पटकावला. यासह महिला टेनिसला अाता पुन्हा एकदा नवीन सुपरस्टार चॅम्पियन मिळाली अाहे. १२ वर्षांनंतर अाॅस्ट्रेलियन अाेपनमध्ये सर्वात युवा चॅम्पियन ठरली अाहे. अमेरिकेच्या साेफिया केनिनने महिला एकेरीच्या फायनलमध्ये दाेन वेळच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियन मुगुरझाचा पराभव केला. तिने ४-६, ६-२, ६-२ अशा फरकाने सामना जिंकला. यासाठी तिला दाेन तास तीन मिनिटे शर्थीची झंुज द्यावी लागली. यात बाजी मारून तिने सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम ट्राॅफीवर नाव काेरले. तिच्या करिअरमधील हा पहिलाच ग्रँडस्लॅम किताब ठरला.
दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेत पहिल्यांदाच फायनल गाठणारी खेळाडू ही विजेतेपदाची मानकरी ठरली अाहे. यापूर्वी गतवर्षी कॅनडाच्या बियांका अांद्रेस्कूने पहिल्यांदाच फायनल गाठून अमेरिकन अाेपन टेनिस स्पर्धेची ट्राॅफी पटकावली हाेती.
माजी नंबर वन मुगुरझाला दमदार सुरुवात केल्यानंतरही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिनेही पहिल्यांदाच या स्पर्धेची फायनल गाठली हाेती. साेफिया केनिन ही अाॅस्ट्रेलियन अाेपनची ट्राॅफी जिंकणारी १८ वी अमेरिकन टेनिसपटू ठरली. ती गत दहा वर्षांत ग्रँडस्लॅम चॅम्पियन ठरलेली अमेरिकेची तिसरी टेनिसपटू ठरली. तिला अाता ४.१२ मिलियन डाॅलर (२९.४ काेटी) अाणि ट्राॅफी देऊन गाैरवण्यात अाले.
सर्वात युवाचा विक्रम
अमेरिकेची २१ वर्षीय केनिन ही सर्वात युवा ग्रँडस्लॅम चॅम्पियन ठरली अाहे. वय वर्षे २१ अाणि ८० दिवसांच्या केनिनने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले अाहे. रशियाच्या शारापाेवाने २० व्या वर्षी ग्रँडस्लॅम चॅम्पियन हाेण्याचा विक्रम नाेंद अाहे. जन्म रशियात झालेली केनिन ही अमेरिकेकडून खेळत अाहे. तर, अमेरिकेत जन्मलेली शारापाेवा रशियाकडून खेळते.
रशियात जन्म; वयाच्या पाचव्या वर्षी काेर्टवर
केनिनचा जन्म १९९८ मध्ये रशियात झाला. तिने वयाच्या पाचव्या वर्षापासून टेनिस खेळायला सुरुवात केली. तिने वयाच्या १४ व्या वर्षी पहिला प्राेफेशनल किताब जिंकला हाेता. त्यानंतर तिने २०१५ मध्ये ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप जिंकली हाेती. अाता तिने फायनलपर्यंतचा पल्ला गाठताना स्पर्धेत अव्वल मानांकित अॅश्ले बार्टीचा पराभव केला.
जागतिक क्रमवारीत सर्वाेत्तम स्थानावर
केनिनला किताबासह जागतिक क्रमवारीतही माेठी प्रगती साधता अाली. तिने टाॅप-१० मध्ये धडक मारली. स्पर्धेत सहभागी हाेताना ती क्रमवारीत १५ व्या स्थानावर हाेती. अाता किताबाने तिला क्रमवारीत अाठ स्थानांनी सुधारणा करता अाली. तिने सातवे स्थान गाठले. ती टाॅप-१० मध्ये पदार्पण करणारी १९९९ नंतर सर्वात युवा अमेरिकन ठरली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.