आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Software Designed To Recognize The Early Stage Of Cancer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅन्सरची प्रारंभिक अवस्था ओळखण्यासाठी तयार केले साॅफ्टवेअर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिलासपूर -  सायन्स कॉलेजचे आयटी विभागप्रमुख डॉ. तरुणधर दिवाण यांनी संशोधनानंतर स्किन कॅन्सर डिडक्शन अँड मेझरमेंट सॉफ्टवेअर यंत्र तयार केले आहे. लर्निंग तंत्राचा वापर करून याला बनवले आहे. या तंत्राने कॅन्सरच्या पहिल्या स्टेजची माहिती घेता येते. यामुळे ज्यांना पहिली स्टेज माहिती होत नाही ती लास्ट स्टेजला कळते. त्यामुळे डाॅक्टरही हात टेकवतात, अशा रुग्णांना या सॉफ्टवेअरमुळे वाचवता येणार आहे.

 

डॉ. दिवाण यांच्या या संशाेधनाचे जगभरातील लोकांनी कौतुक केले आहे. हे तंत्र मार्केटमध्ये आणण्यासाठी व ते पुढे नेण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम सुरू झाले आहे. डॉ. दिवाण  यांना इंटरनॅशनल रिसर्च एजन्सीद्वारे बेस्ट रिसर्च पेपर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.   

 

सॉफ्टवेअर सांगेल शरीरात किती भागात पसरलाय कॅन्सर  
डॉ. दिवाण यांनी सांगितले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राच्या माध्यमातून संगणक अथवा यंत्राला स्कीन कॅन्सर ओळखण्यासाठी व क्लासिफाइड करण्यासाठी ट्रेंड केले आहे. प्रारंभिक स्टेजमध्ये स्कीन कॅन्सर ओळखण्यासाठी मशीन लर्निंग व डीप लर्निंग, इमेज रिस्टोरेशन, बाउंड्री-व्हॅल्यू कॅल्क्युलेशन, इमेज एन्हासमेंट तंत्राचा वापर करण्यात आला आहे.

 

तपासणीच्या वेळी हे यंत्र जेथे कॅन्सर आहे तेथेच लावता येईल. तेथे कॅन्सर असेल तर कोणत्या भागात तो पसरलेला की, कमी आहे याची सर्व माहिती तो देईल. यामुळे योग्य वेळेत कॅन्सर पसरण्यापासून रोखण्यात यश मिळेल. आता जेथे सर्वात जास्त कॅन्सर ज्या भागात दिसेल तेथे उपचार सुरू होतो. जेथे उपचार सुरू हाेतो तेव्हा जेथे कमी असेल त्या भागात कॅन्सर पसरतो. यामुळे त्याला नष्ट करणे अवघड होते. या यंत्रामुळे कोठे किती प्रमाणात कॅन्सर आहे ते समजू शकेल.  

 

बेस्ट पेपर अवॉर्ड मिळाले  
इंटरनॅशनल रिसर्च एजन्सी जेथे जनरल प्रकाशित होतात, देशभरातील प्राध्यापक आपले संशोधन यात प्रसिद्ध होण्यासाठी पाठवतात. पाठवलेल्या संशोधनाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर परीक्षण केले जाते. परीक्षणानंतर जर संशोधन तज्ज्ञांना योग्य वाटले तर ते प्रकाशित केले जाते. वर्षभरात सर्वात चांगले संशोधन म्हणून डॉ. दिवाण यांना बेस्ट पेपर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. 

 

२०१८ मध्ये आढळले ११ लाख ५७ हजार २९४ नवे कर्करुग्ण  
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, देशाची लोकसंख्या १ अब्ज ३५ कोटी ४० लाख ५१ हजार ८५५ इतकी आहे. यात पुरुषांची संख्या ७० कोटी १५ लाख  ४६ हजार ९८० व  महिलांची ६५ कोटी २५ लाख ४ हजार ८७८ इतकी आहे. २०१८ मध्ये देशात ११ लाख ५७ हजार २९४ नवे कॅन्सरचे रुग्ण आढळले. यापैकी ७ लाख ८४ हजार ८२१ कर्करोग रुग्णांचा मृत्यू झाला आहे.