आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवक द्यायचा त्रास, महिला इंजिनीअरने मित्रांसोबत मिळून शिकवली अद्दल...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- येथून चकित करणारी घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका सॉफ्टवेअर इंजीनिअरला अटक केले आहे, तर युवतीला एका व्यक्तीला किडनॅप केल्याप्रकरणी अटक केले आहे. एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या युवतीने 6 महिन्यांपासून त्रास देणाऱ्या युवकाला अद्दल घडवण्यासाठी त्याच्या किडनॅपिंगची प्लॅनिंग केली. 


आरोपी युवतीने आपल्या मित्रांसोबत मिळून एका कारपेंटरचे अपहरण केले. 23 वर्षीय व्ही. साई कुमार जो व्यवसायाने सुतार होता, त्याने आपल्या मित्राच्या घरी युवतीला पाहिले होते. त्यानंतर त्याने युवतीचा नंबर मिळवला आणि तिला त्रास देण सुरू केले.


फोन कॉल आणि मेसेजने त्रस्त होऊन सायबराबादमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर पदावर काम करणाऱ्या युवतीने त्या युवकाला अद्दल घडवण्याची प्लॅनिंग केली. त्यानंतर तिने आपल्या 5 मित्रांच्या मदतीने कारपेंटरला सिकंदराबादमध्ये एका कॉलेजजवळ भेटायला बोलवले. साई कुमार तेथे गेला, त्यानंतर त्याला मारहाण करून एका निर्जण जागेवर घेऊन जाण्यात आले.


गोपालपूरचे एसीपी के. श्रीनिवास राव यांनी सांगितले की, मुलीचा त्या युवकाला मारण्याचा प्लॅन होता. त्या युवकाने कसेबसे आपली सुटका करून घेतली, आणि रूग्णालयात भर्ती झाला. त्यानंतर पोलिसांनी युवकाच्या तक्रारीवरून आरोपी युवती आणि तिच्या 5 मित्रांना ताब्यात घेतले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...