आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आई होणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी सोहाचे 7 सल्ले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री सोहा अली खानने एका मुलीला जन्म दिल्यानंतरही आपला फिटनेस कायम राखला आहे. बाळंतपणानंतर फिगर कायम ठेवण्यासाठी सोहा खास गोष्टींची काळजी घेण्यास सांगते. तिच्या या टिप्स प्रत्येक आईसाठी उपयुक्त आहेत.

1. पौष्टिक आहार
गरोदरपणात योग्य पोषक द्रव्ये घेणे गरजेचे आहे. यामुळे डिलिव्हरी नॉर्मल होईलच, पण गरोदरपणात होणाऱ्या सामान्य त्रासांपासूनही बचाव होतो. त्यामुळे नैसर्गिक पदार्थांचे सेवन करा आणि रसायनयुक्त खाद्यपदार्थांपासून दूर राहा. आहारात फळे, भाज्या, कडधान्ये आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.

2. व्यायाम करा
त्या ९ महिन्यांच्या काळात तुम्हाला फिट ठेवण्यामध्ये व्यायाम खूप मदत करतो. योगासनांसोबतच वॉकिंग करत तुम्ही आपल्या वजनावर नियंत्रण ठेवू शकता. बाळंतपणानंतरही वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल.

3. सकारात्मक विचार
गरोदरपणात महिलांमध्ये अनेक शारीरिक व मानसिक बदल होतात. अशा वेळी नकारात्मक विचारांपासून दूर राहा. नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. तुमचे विचार मुलाची वाढ प्रभावित करू शकतात.

4. तणावमुक्त राहा
गरोदरपणात शांत आणि तणावमुक्त राहा. तणाव दूर करण्यासाठी योगाचा आपल्या दैनंदिनीत समावेश करा. याशिवाय नियमितपणे ध्यानधारणा करा. यामुळे तणाव व राग शांत करण्यात तुमची मदत होईल.

5. हायड्रेट राहा
गरोदरपणात स्वत:ला हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. अनेकदा पाण्याच्या कमतरतेमुळे थकवा किंवा अशक्तपणा जाणवायला लागतो. यापासून बचाव करण्यासाठी दिवसातून कमीत कमी ८-१० ग्लास पाणी प्या.

6. प्रिनेटल सप्लिमेंट्स
बाळाची जन्मदोषाची जोखीम कमी करण्यासाठी गरोदरपणात प्रिनेटल सप्लिमेंट्स घ्या. हे गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या वाढीसाठी आवश्यक आहे. हे सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

7. पुरेशी झोप
गरोदरपणात रात्री उशिरापर्यंत जागरण करणे टाळा. यामुळे तुमच्या आणि बाळाच्या विकासावर नकारात्मक प्रभाव पडेल. तुमच्यासाठी कमीत कमी ८ तासांची झोप आवश्यक आहे, जेणेकरून शरीराला आराम मिळेल. झोप येत नसेल तर डॉक्टरांशी संपर्क करा.

बातम्या आणखी आहेत...