आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहराबुद्दीन चकमक बनावटच होती! बड्या नेत्याचा होता आदेश, अंतिम युक्तीवादात सीबीआयची स्पष्टोक्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील सर्वात चर्चित एनकाउंटर्सपैकी एक सोहराबुद्दीन चकमकीवर सीबीआयने विशेष न्यायालयात आपला अंतिम युक्तीवाद मांडला. यामध्ये सोहराबुद्दीन चकमक बनावटच होती असे तपास संस्थेने स्पष्ट केले आहे. 2005 मध्ये राजस्थान आणि गुजरात पोलिसांच्या संयुक्त टीमकडून सोहराबुद्दीन एनकाउंटर घडला होता. यानंतर 2006 मध्ये त्याचा जवळिक तुलसीराम प्रजापती यालाही ठार मारण्यात आले होते. सीबीआयने हे दोन्ही एनकाउंटर फेक ठरवले आहेत.


बड्या नेत्याच्या आदेशावर झाले फेक एनकाउंटर

> विशेष सीबीआय न्यायालयात सीबीआयची बाजू मांडणारे वकील बीपी राजू यांनी सांगितल्याप्रमाणे, दोन्ही एनकाउंटर बनावट असल्याचे पुरावे तपास संस्थेने कोर्टासमोर सादर केले आहेत. राजस्थानच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तपास अहवालात सोहराबुद्दीनचे लश्कर ए-तोयबाशी संबंध असल्याचा खोटा दावा करण्यात आला होता. एवढेच नव्हे, तर तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता असेही चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात त्याचे एनकाउंटर एका बड्या राजकीय नेत्याच्या इशाऱ्यांवर घडवण्यात आले होते. 
> राजस्थान पोलिसांत त्यावेळी सब-इंस्पेक्टर राहिलेले कुंभ सिंह यांनी आपल्याला कुठल्याही मोठ्या नेत्याचे आदेश आलेले नव्हते असे म्हटले. सोबतच, सोहराबुद्दीनचे एनकाउंटर गुप्त सुत्रांच्या माहितीवरच करण्यात आले असा दावा त्यांनी केला होता. परंतु, ज्या सूत्राकडून माहिती मिळाली होती त्याची चाचपणी किंवा चौकशी झालीच कशी नाही असा सवाल न्यायाधीश एसजे शर्मा यांनी उपस्थित केला.

 

खिशात सापडलेल्या तिकीटावर रक्ताचे डाग का नाहीत?
सरकारी वकील बीपी राजू यांनी तिकीटांवर सुद्धा कोर्टाचे लक्ष वेधले. पोलिसांनी सोहराबुद्दीनचा कथित एनकाउंटर केल्यानंतर त्याच्या खिशातून एक तिकीट सापडल्याचे सांगितले आहे. सुरत ते अहमदाबाद असे ते तिकीट कोर्टातही सादर करण्यात आले. विशेष बाब म्हणजे, एनकाउंटरनंतरही तिकीटावर रक्ताचे डाग कसे नाहीत. अर्थातच पोलिसांनी रचलेले हे एक नाट्य होते. सोहराबुद्दीनच्या जीवाला कुणाकडून धोका होता हे त्याच्या मरण्याच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या कॉल रेकॉर्ड्सवरून स्पष्ट होईल. पोलिसांनी जो गावठी कट्टा तुलसीराम प्रजापतीच्या नावे सादर केला त्यावर बोटाचे ठसे सापडलेले नाहीत. केवळ सोहराबुद्दीनच नव्हे, 2006 मध्ये अशाच प्रकारे बनावट एनकाउंटरमध्ये तुलसी प्रजापतीला ठार मारण्यात आले होते असे राजू यांनी सांगितले आहे.


दरम्यान, आरोपींच्या वकिलांनी सुद्धा कोर्टात आपले अंतिम युक्तीवाद मांडण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही पक्षांचे युक्तीवाद आणखी काही दिवस असेच सुरू राहतील. त्यामुळे, अंतिम निकाल समोर येण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...