आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहराबुद्दीन चकमक प्रकरण: वंजारांसह पाच जणांच्या मुक्ततेचा निकाल कायम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणात मुंबई हायकोर्टाने गुजरात एटीएसचे माजी प्रमुख व राजस्थान, गुजरातच्या ४ इतर पोलिस अधिकाऱ्यांच्या निर्दोष मुक्ततेचा सीबीआय न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. न्या. ए.एम. बदर यांनी सोमवारी मुक्ततेच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या पाच याचिका फेटाळल्या. 


सबळ पुराव्यांअभावी सत्र न्यायालयाने योग्य निर्णय दिल्याचे हायकाेर्टाने सांगितले. तसेच बहुतांश अधिकाऱ्यांवर आरोप निश्चित करण्यापूर्वी सरकारकडून परवानगी घेतलेली नसल्याचे कोर्टाने सांगितले. वंजारांसह गुजरातचेे राजकुमार पांडियन, ए.के. अमीन, विपुल अग्रवाल आणि राजस्थानच्या दिनेश एम.एन व दलपतसिंह राठोड यांची मुक्तता झालेली आहे. 

बातम्या आणखी आहेत...