आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान आवास योजनेत सोलापूर शहर खूपच मागे; केवळ ३६३ जणांना अनुदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सर्वांसाठी घर ही संकल्पना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाकांक्षी घरकुल योजना सुरू केली. परंतु, सोलापूर शहर या योजनेमध्ये फारच मागे असल्याचे दिसून आले आहे. मागील ४ वर्षांमध्ये पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल साकारण्यासाठी एकूण ५१ हजार ३६३ अर्ज आले. त्यातील केवळ ३६३ जणांना अनुदान मिळू शकले आहे. पंतप्रधान आवास योजनेविषयी असलेला निरुत्साह दूर करण्यासाठी डाॅ. अविनाश ढाकणे यांनी २९ आॅगस्ट रोजी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली असणार आहे. 


चार घटकांपैकी एकासही नाही अनुदान 
१. ही योजना चार घटकांसाठी आहे. घटक एकमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५ हजार ७३३ अर्ज आले. यापैकी २ हजार ३५६ अर्ज मंजूर झाले. पण, अद्याप एकही जणाला घरकुल अनुदान मंजूर नाही. 
२. घटक दोनमध्ये व्याज अनुदानात ६१४ जणांनी अर्ज केले. त्यापैकी एकही प्रकरण मंजूर नाही. किंवा मंजुरी मिळाली असेल तरी त्याची माहिती महापालिकेकडे आलेली नाही. बँकेकडून कर्ज करून त्यात अनुदान समावेश करून घरकुल बांधणे हे यात अपेक्षित आहे. 
३. घटक तीनमध्ये खासगी भागीदारीत परवडणारी घरे बांधली जातात. यात ४३ हजार ३१४ जणांनी अर्ज केले आहे. यात घरकुल देण्यासाठी दोन बिल्डर पुढे आले. पण, बांधकाम परवान्यातील त्रुटी व अन्य कारणांमुळे घरकुलांचे अनुदान कोणासही मिळाले नाही. 
४. घटक चारमध्ये स्वत:च्या जागेत बांधकाम करण्यासाठी अनुदान दिले जाते. यासाठी १ हजार ७०३ अर्ज आले. त्यापैकी ३६२ जणांचे अर्ज मंजूर झाले. पण एकाचेही घरकुल बांधून पूर्ण झालेले नाही. 


निरुत्साहामागील कारणे... 
लोकांना योजनेबद्दल पुरेशी माहिती नाही. कागदपत्रांची पूर्तता न करणे हेही प्रमुख कारण आहे. घटक तीनमध्ये उंच इमारत अपेक्षित असल्याने झोपडपट्टीतील व्यक्ती इच्छुक नाही. 

 

निविदा काढल्या, पण... 
यल्लेश्वर वाडी, धाकटा राजवाडा आणि जय भीम वाढीव येथील घरकुलांसाठी महापालिकेने निविदा काढल्या. पण कोणी मक्तेदार पुढे आले नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...