Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Solapur Dr. Yeole, Sheikh have announced state-level model teacher award

सोलापूरच्या डाॅ. येवले, शेख यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

दिव्य मराठी | Update - Aug 29, 2018, 11:36 AM IST

सोलापुरातील गावडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे सहाय्यक शिक्षक डाॅ. नागनाथ अप्पासाहेब येवले आणि विजापूर रोडवरील निर्मलात

  • Solapur Dr. Yeole, Sheikh have announced state-level model teacher award

    सोलापूर - सोलापुरातील गावडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे सहाय्यक शिक्षक डाॅ. नागनाथ अप्पासाहेब येवले आणि विजापूर रोडवरील निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे सहायक शिक्षक युसूफ शेख यांना राज्य शासनाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरण होणार आहे. डाॅ. येवले आणि शेख यांनी इंग्रजी विषयावर काम केले असून, सोप्या अध्यापन पद्धतीचा अवलंब केला.

    राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची मंगळवारी घोषणा करण्यात आली. त्यात राज्यातील १०८ शिक्षकांचा समावेश आहे. प्राथमिक ३८, माध्यमिक ३९, आदिवासी क्षेत्र १८, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका ८, विशेष पुरस्कार २, अपंग १, गाइड १, स्काऊट १ अशा एकूण १०८ शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला


    दहा रुपयांत ६०० शब्दांची डिक्शनरी
    डाॅ. येवले यांनी आतापर्यंत तिल्हेहाळ, कुलकर्णी तांडा, वटवटे येथे काम केले. तेथे त्यांनी ६०० शब्दांची डिक्शनरी तयार करून ती दहा रुपयांत उपलब्ध केली. त्यांनी पाच पुस्तके लिहिली आहेत. मुलांना इंग्रजी सोपी करून शिकवण्यासाठी ठोकळ प्रशालेचे शेख यांनी यूट्यूबचा आधार घेतला. यामुळे मुलांची गोडी वाढून त्यांच्या इंग्रजीमध्ये सुधारणा झाली.

Trending