आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांचा गोंधळ, महापौरांचा रस्ता रोखला, माठ फोडून निषेध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरात चार दिवसांआड पाणीपुरवठा होतोय, नगरसेवकांना भांडवली निधी दिला जात नाही, महापालिका आयुक्त नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक देतात, शहरात अंधार आहे, दिवाबत्तीचा सोय नाही, डेंग्यूसह साथीचे आजार शहरात पसरतात. यासह अन्य कारणासाठी शनिवारी झालेल्या महापालिका सभागृहात काँग्रेस, एमआयएम, बसप, राष्ट्रवादी, माकप नगरसेवकांनी सत्ताधारी व प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत माठ फोडले. समस्यांचे डिजिटल जॅकेट अंगावर परिधान करून सभागृहात घोषणाबाजी केली. सभा तहकूब करून जाताना महापौरांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न झाला. सभागृहात पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली.गोंधळानंतर महापौर कक्षात चर्चा झाली. दोन दिवसात निधीबाबत निर्णय घेतो, असे सांगत चर्चा संपली. 

 

नोव्हेंबरची सर्वसाधारण सभा शनिवारी झाली. सभा सुरू होण्यापूर्वी काँग्रेस, एमआयएम, बसप, राष्ट्रवादी, माकपचे नगरसेवक सत्ताधारी व प्रशासन यांच्या विरोधातील घोषवाक्य लिहिलेले डिजिटल जॅकेट घालून आले होते. 


महापौर आल्यावर नगरसेवक विनोद भोसले, रियाज हुंडेकरी, अनुराधा काटकर, श्रीदेवी फुलारे यांनी घोषणा देत माठ फोडले. घोषणाबाजी करत असताना महापौर शोभा बनशेट्टी यांनी केंद्रीय मंत्री अनंतकुमार, माजी मंत्री आनंदराव देवकते यांच्यासह इतररांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब केली. 

 

राष्ट्रगीताच्या वेळी काळे जॅकेट घातले 
सभागृहात राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर विरोधी नगरसेवक निषेधाचे काळे जॅकेट घालून थांबूनच राहिले. निदान राष्ट्रगीतावेळी तरी जॅकेट काढणे अपेक्षित होते. दरम्यान महापौरांना विरोधकांनी अडविल्यानंतर सभागृहात बिगर गणवेशाचे पोलिस आले. नगरसेवक चंदनशिवे सभागृहात पोलिस येऊ शकत नाही, असे म्हणाले. चर्चा करण्याची तयारी महापौरांनी दाखवल्यानंतर त्यांना वाट मोकळी करून दिली. 

 

निधी नाही, कामे होत नसेल तर राजीनामा फेकतो 
महापालिका आयुक्त म्हणतात, सभागृहात विषय मंजूर होत नाही. ते राजकारण करतात. आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या, आम्ही नागरिकांचे प्रश्न मांडतो, आम्ही तुमचे नाही जनतेचे सेवक अाहोत. काम होत नसेल तर राजीनामा फेकतो, असे म्हणत नगरसेवक चंदनशिवे आक्रमक झाले. कोळी म्हणाले, महापौरांचा सन्मान राखला पाहिजे, असे मत व्यक्त केले. आम्ही महापौरांचा सन्मान करतो. पण महापौरांनी नीट बोलावे, असे म्हणत आक्रमक भूमिका घेतली. 

 

आयुक्तांनी बोलणे बंद केले 
नगरसेवकांच्या प्रश्नावर पाणीपुरवठा अधिकारी दुलंगे बोलत असताना त्यांच्या बोलण्यावर नगरसेवक नरोटेंनी आक्षेप घेतला. आयुक्त डाॅ. ढाकणे उत्तर देत असताना अडवणूक केली. तेव्हा तुम्ही वारंवार व्यत्यय आणत असाल तर मी बोलणार नाही व उत्तर देणार नाही, असे म्हणत बोलणे बंद केले. 

 

आरोप- प्रत्यारोप व घडामोडी 
Á आयुक्त व चंदनशिवे यांच्यात वाद. 
Á पाणीपुरवठा अधिकारी व्यवस्थित वागत नाहीत : किसन जाधव 
Á आमच्याकडे रात्रीचा पाणीपुरवठा : नगरसेविका रोटे 
Á हद्दवाढ भागात पाणीपुरवठा सुरळीत करा : तौफिक शेख 
Á सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक डाॅ. राजेश अणगिरे आंदोलनात 
Á आजारी भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांची सभागृहात हजेरी 

बातम्या आणखी आहेत...