आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रताप गाढे
जालना - कम्युनिकेशन, कोलॅबरेशन हे २१ व्या शतकातील कौशल्य साध्य करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. या माध्यमाचा उपयोग शैक्षणिक क्षेत्रात व्हावा यासाठी मायक्रोसॉफ्ट ही अमेरिकी संस्था काम करते. या संस्थेच्या माध्यमातून दिलेल्या शैक्षणिक कृतींना प्रतिसाद देणाऱ्या देशभरातील हजारो शिक्षकांना एज्युकेटर एक्स्पर्ट म्हणून नियुक्त केले आहे. राज्यात ही संख्या २० च्या घरात आहे. यापैकीच जालन्यातील जिल्हा परिषद शाळेतील दोदडगाव शाळेतील शिक्षिका नीता अरसुळे यांनी मायक्रोसॉफ्टने घेतलेल्या विन व्हॉईसपॉड स्पर्धेत सहभाग नोंदवून राज्यातील सर्वाधिक शैक्षणिक साहित्याच्या दहा किट मिळवल्या. राज्यात सोलापूर, पुणे अाणि अहमदनगर यांना प्रत्येकी १ आणि जालन्यासाठी १० किट मिळाल्या आहेत. जालना जिल्हा परिषदेच्या सीईओ अरोरा यांनी हे किट तंत्रस्नेही शिक्षिकेच्या स्वाधीन केल्या.
मायक्रोसॉफ्टने बदलत्या तंत्रज्ञानानुसार कृतियुक्त अभ्यासक्रम कसा असावा, यासाठी शासकीय शाळांतील तंत्रस्नेही शिक्षकांना बरोबर घेत ताे देशभरात पसरवला आहे. यामध्ये परिसरानुसार विषयांवर एज्युकेटर एक्स्पर्ट म्हणून नियुक्त केले आहे. त्यांच्या माध्यमातून देश विदेशातील शाळा, शिक्षणाची देवाण घेवाण करणे, विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणने, कृती करून घेण आदी उपक्रम अॉनलाइन करून घेतले. यानंतरचा पुढील टप्पा गाठण्यासाठी विन व्हॉईसपॅड ही मायक्रोसॉफ्टकडून ऑगस्टमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. यात मायक्रोसॉफ्टचे एज्युकेटर एक्स्पर्ट सहभागी झाले होते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कृतींचे व्हिडिअाे पाठवणे, विद्यार्थ्यांना प्रश्न देत त्यांची परीक्षा घेणे, कृती करून घेणे आदी कृतियुक्त प्रश्नावली होती. यामध्ये दोदडगावच्या शिक्षिका तसेच एज्युकेटर एक्स्पर्ट नीता अरसुळे यांनी ५० व्हिडिओ पाठवले होते. या शाळेचा प्रतिसाद पाहता मायक्राेसॉफ्टने दखल घेत दहा किट दिल्या. अभ्यासक्रमावर उच्च दर्जाचा संवाद साधता यावा या हेतूने मायक्रोसॉफ्ट काॅर्पोरेशन वाशिंग्टन, येथून या किट पाठवण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने या किट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते उघडून शिक्षिका नीता अरसुळे यांच्या स्वाधीन करण्यात आल्या. या वेळी जालना जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी नागेश मापारी, जालना अधिव्याख्याता प्रकाश मान्टे, राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त सुनील ढाकरके, भगवान जायभाये, सुनील साबळे, ईश्वर गाडेकर आदी उपस्थित होते.
उद्देश : विद्यार्थ्यांच्या कृतींचा व्हिडिओ गुणवत्तापूर्ण व्हावा
देश विदेशातील कृती एकत्र व्हाव्यात म्हणून यामध्ये कृतींचा व्हिडिओ गुणवत्तापूर्ण व्हावा तसेच इतरांनाही पाहता यावा यासाठी साहित्य दिले आहे. विद्यार्थ्यांना बोलते करण्यासाठी स्टुडंट वॉईस, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढवण्यासाठीच्या कृती-साहित्य, मुलांच्या शैक्षणिक मूल्यमापनासाठी सुविधांबरेाबरच तंत्रज्ञानाचे कौशल्य ज्यामध्ये रेकॉर्डिंग करणे, व्हिडिअाेला योग्यरीत्या सामोरे जाणे, व्हिडिओचे सादरीकरण करणे, अध्ययन -अध्यापनातील महत्वाची साहित्य देण्यात आले आहेत. ही किट विज्ञान, गणित, भाषा, सामाजिक शास्त्रे आदी विषयांसाठी फायदेशीर आहे. यात डिस्को लायब्ररी देण्यात आली असून यात जगभरातील नावीन्यपूर्ण व्हिडिओ, कृती साठवणारे एक ई-ग्रंथालय अाहे. यावरील लेसन पाठवणे तसेच इतरांकडून कृती शेअर करण्याची व्यवस्था आहे.
जगभरात विद्यार्थ्यांचा संवाद
जगभरातील शैक्षणिक माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी व इतर देशांतील शिक्षण, विद्यार्थी, अध्ययन, अध्यापन, विषय अादींची देवाण -घेवाण व्हावी म्हणून मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून हा शैक्षणिक प्रयत्न अाहे. ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम आमच्या माध्यमातून पोहाेचत आहे. - नीता अरसुळे, मायक्रोसॉफ्ट एज्युकेटर एक्सपर्ट, जालना
जिल्हा परिषदेसाठी गौरवाची बाब
एका जिल्हा परिषदेच्या ग्रामीण शाळेतील शिक्षकांनी केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद अाहे. थेट अमेरिकतून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात भर पाडणाऱ्या वस्तू मिळवणे ही मोठी बाब असून दोदडगाव ही पहिलीच शाळा ठरल्याबद्दल शिक्षिका तसेच शाळेचे कौतुक आहे. जिल्हा परिषदेसाठी ही गौरवाची बाब आहे. - निमा अरोरा, सीईओ, जि.प. जालना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.