आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव स्कार्पिओची दुचाकीला पाठीमागून जोराची धडक, अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहोळ - भरधाव वेगात आलेल्या स्कार्पिओने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. सदरील घटना बुधवार (11 डिसेंबर) रोजी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास घडली. अपघातानंतर उपचारासाठी नेत असताना दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मोहोळस - सोलापूर रस्त्यावरील वडवळ फाट्यासमोर हा अपघात घडला. 
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धोंडीबा सुभाष चव्हाण रा. मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर हे आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच. 13, बी. वाय.9970 वरून वडवळकडून सोलापूरच्या रस्त्याकडे जात होते. त्याच दरम्यान मोहोळकडून सोलापूरकडे भरधाव वेगात निघालेल्या एम. एच.12, आर. टी.9300 या स्कार्पिओ गाडीने चव्हाण यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामध्ये चव्हाण गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रुग्णवाहिकेतून सोलापूरकडे उपचाराला घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सावळेश्वर टोल प्लाझाचे कर्मचारी अमर डोंबे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात माहिती दिली असून अधिक तपास अपघात पोलिस करत आहेत.