आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर सिद्धेश्वर मंदिर अल्पावधीत होणार सुवर्ण सिद्धेश्वर, ॲनिमेशन व्हिडिओतून मंदिराची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शिवयोगी सिद्धरामेश्वर यांची जत्रा सोलापुरात जानेवारी महिन्यात होत असते. यानिमित्त शहरात पाच दिवस उत्सवाचे वातावरण असते. सोलापूर सिद्धरामेश्वर मंदिर आणि अमृतसर येथील हरमंदिर साहेब म्हणजे गोल्डन टेम्पल यांच्यामध्ये साम्य असणारा विषय दैनिक दिव्य मराठीने 2015 साली सोलापूरकरांचा समोर ठेवला होता.
सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिराचा परिसर अमृतसरच्या गोल्डन टेम्पल पेक्षाही मोठा असून सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिराचेही स्वर्ण सिद्धेश्वर मंदिरात रूपांतर करता येईल अशा प्रकारचा हा विषय होता. 2015 पासून आजपर्यंत दिव्यमराठी याचा पाठपुरावा करीत असून भाविकांच्या देणगीतून करोडो रुपयांचा निधी तसेच विविध कंपन्यांच्या सीएसआर फंड मधून विविध विकास कामे झालेली आहेत. सध्याला शेतकरी आर्थिक गर्भ सोन्या-चांदीने मढविण्यात आलेले असून पुढील काळात देणग्या, सीएसआर फंड आणि स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध विकास कामे होणार आहेत. भविष्यात हे मंदिर किंवा त्याच्या आजूबाजूचा परिसर कसा असेल या संबंधीचा हा व्हिडिओ असून ॲनिमेशन द्वारे काही गोष्टी यामध्ये दाखविण्यात आलेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...