आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवार, अमावस्या आणि सूर्यग्रहण योग : चुकूनही करू नका हे 5 काम, वाढेल गरिबी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ष 2018 मधील शेवटचे सूर्यग्रहण शनिवार 11 ऑगस्टला होत आहे, परंतु हे ग्रहण भारतात दिसणार नाही. यामुळे ग्रहणाचा सुतक काळ भारतात पाळण्याची आवश्यकता नाही. यानंतर 2018 मध्ये एकही सूर्यग्रहण नाही. या दिवशी अमावास्या आहे. शनिवारी ही तिथी आल्यामुळे याला शनिश्चरी अमावास्या असेही म्हणतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार सूर्यग्रहण आंशिक राहील आणि नॉर्थ अमेरिका, नॉर्थ पश्चिम आशिया, साऊथ कोरिया, मॉस्को, चीनसहित इतर देशांमध्ये दिसेल.


केव्हा सुरु होणार ग्रहण
हे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी जवळपास 1.32 मिनिटांनी सुरु होऊन संध्याकाळी 5 वाजता समाप्त होईल. ग्रहण जवळपास 3 तास आणि 30 मिनिट दिसेल.


कसे होते सूर्यग्रहण 
पृथ्वी स्वतःभोवती फिरत सूर्याचे एक चक्कर पूर्ण करते. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीच्या काही भागात सूर्य दिसत नाही. यालाच सूर्यग्रहण म्हणतात.


शनिवार अमावस्या आणि सूर्यग्रहण योगात काय करू नये...
> या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी अंथरून सोडावे. सूर्योदय झाल्यानंतर झोपू नये.


> ज्या भागांमध्ये हे सूर्यग्रहण दिसेल, तेथे राहणाऱ्या लोकांनी पूजा-पाठ करू नये.


> अमावस्येला पती-पत्नीने दुरावा ठेवावा, संबंध बनवू नये. या दरम्यान करण्यात आलेल्या संबंधामुळे जन्मास येणाऱ्या अपत्याला अडचणींना सामोरे जावे लागू शकते.


> आई-वडील, गुरु आणि इतर वडीलधारी मंडळींचा अपमान करू नये. अन्यथा दुर्भाग्याला सामोरे जावे लागू शकते.


> शनिश्चरी अमावास्येला क्रोध करू नये. घरामध्ये अशांती असल्यास देवाची कृपा प्राप्त होत नाही. पूजा-पाठ अपयशी होतात.


पुढील स्लाईड्सवर वाचा, शनिवार अमावस्या आणि सूर्यग्रहण योगात काय करावे... 

बातम्या आणखी आहेत...