आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिसेंबरमध्ये सूर्यग्रहण होईल, या महिन्यातच साजरी केली जाईल श्रीदत्त आणि गीता जयंती

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

रविवारपासून वर्ष २०१९ मधील शेवटचा महिना डिसेंबर सुरु झाला आहे. या महिन्यात विविध विशेष तिथी येत आहेत. डिसेंबर महिन्यात दत्त जयंती, मोक्षदा एकादशी, मार्गशीर्ष पौर्णिमा, तसेच अमावस्या असेल. या व्यतिरिक्त डिसेंबर महिन्यात सूर्यग्रहणही असेल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, या महिन्यात कोणत्या तिथिला कोणते शुभ काम केले जाऊ शकतात...

 • रविवार, 1 डिसेंबरला श्रीराम आणि देवी सीता विवाह उत्सव आहे. यालाच विवाह पंचमी असे म्हणतात. या दिवशी प्रभू श्रीराम आणि देवी सीतेची विशेष पूजा करावी. सुंदरकांड आणि हनुमान चालीसाचे पाठ करावेत.
 • रविवार, 8 डिसेंबरला मार्गशीर्ष मासातील एकादशी आहे. यालाच मोक्षदा एकादशी असे म्हणतात. या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते. मान्यतेनुसार, या तिथीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता. या दिवशी गीतेचा पाठ करावा.
 • बुधवार, 11 डिसेंबरला मार्गशीर्ष मासातील पौर्णिमा तिथी आहे. यालाच दत्त जयंती असे म्हणतात. या दिवशी भगवान दत्तात्रयाची पूजा करावी.
 • गुरुवार, 12 डिसेंबरला स्नान दानची पौर्णिमा तिथी आहे. या तिथीला पवित्र नदीमध्ये स्नान करून दान करावे.
 • रविवार, 15 डिसेंबरला संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी श्रीगणेशाची विशेष उपासना करावी.
 • सोमवार, 16 डिसेंबरला सूर्य धनु राशीमध्ये प्रवेश करेल आणि धनुर्मास चालू होईल.
 • रविवार, 22 डिसेंबरला सफला एकादशी आहे. या तिथीला भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांची विशेष पूजा करावी.
 • बुधवार, 25 डिसेंबरला अमावास्या आहे. या दिवशी पितर देवतांसाठी तर्पण आणि श्राद्ध कर्म केले जातात. अमावास्येला नदीमध्ये स्नान आणि दान-पुण्य करण्याची प्रथा आहे.
 • गुरुवार, 26 डिसेंबरला सूर्यग्रहण होईल. हे ग्रहण भारतात दिसेल. या दिवशी सुतक काळात पूजा-पाठ करू नये.
 • सोमवार, 30 डिसेंबरला विनायकी चतुर्थी आहे. या दिवशी श्रीगणेशाची विशेष पूजा करावी.
बातम्या आणखी आहेत...