Home | Business | Auto | solar-motorcycle

26 हजारांमध्ये सोलर मोटरसायकल

team divya marathi | Update - May 24, 2011, 04:56 PM IST

पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतींमुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देणारी बातमी आहे. अवघ्या 26 हजार रुपयांमध्ये मोटरसायकल मिळणार आहे.

  • solar-motorcycle

    26 हजारांमध्ये सोलर मोटरसायकल

    पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतींमुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देणारी बातमी आहे. अवघ्या 26 हजार रुपयांमध्ये मोटरसायकल मिळणार आहे. तुम्ही म्हणाल यात काय नविन? तर यात नविन म्हणजे ही मोटरसायकल सौर उर्जेवर धावणारी आहे. ही मोटरसायकल पुण्यात सादर करण्यात आली. अयुब खान नावाच्या मेकॅनिकने ही मोटरसायकल तयार केली आहे. विशेष म्हणजे सौर उर्जेसोबतच बॅटरीवरही ही मोटसायकल चालू शकते. ढगाळ वातावरणात बॅटरी चार्ज करुन मोटरसायकल वापरता येवू शकते. एकदा चार्ज केल्यावर सुमारे 200 ते 250 किलोमीटरपर्यंत मोटरसायकल चालू शकते. मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यास मोटरसायकलची किंमत 16 हजार रुपयांपर्यंत उतरु शकते.

Trending