आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैनिक चंदू चव्हाणची राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची मागणी, 2016 च्या सर्जिकल स्ट्राईकनंतर नकळतपणे गेला होता पाकिस्तानात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  चार महिन्यानंतर पाकिस्तानातून सुटका

चंदू 2016 च्या सर्जिकल स्ट्राइकनंतर 27 सप्टेंबर रोजी नकळतपणे पाकिस्तानच्या हद्दीत गेला होता. तेथील तुरुंगात 3 महिने 21 दिवस त्रास सहन केला होता. यानंतर संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानच्या तावडीतून चंदू चव्हाणची सुटका केली होती. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात चंदूने म्हटले आहे की, तो सध्या सुट्टीवर आहे आणि 29 डिसेंबर रोजी त्याला पुन्हा रुजू व्हायचे आहे. तेथे गेल्यानंतर पुन्हा त्याच्यासोबत भेदभाव केला असा चंदूला संशय आहे. तेथील अधिकाऱ्यांकडून होणारा अवमान आणि त्रासाला कंटाळून चंदूने इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. 

7 महिन्यांपासून मिळाले नाही वेतन 


चंदूने सांगितले की, पाकिस्तानातून परतल्यानंतर त्याला न्यायालयीन चौकशीला सामोरे जावे लागले. यानंतर त्याने सैन्याच्या तुरुंगात 90 दिवसांची शिक्षा भोगली. चंदू म्हणाला की, त्याला अहमदनगरमध्ये पोस्टिंग देण्यात आली आहे. मात्र मागील सात महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. चंदूने आपला मोबाइल फोन आणि ओळखपत्र जप्त केल्याचा आरोपही केला आहे.चंदूविरोधात पाच अनुशासनहीनतेचे गुन्हे दाखल 

यापूर्वी चंदू आपल्या मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर आमरण उपोषणासाठी बसला होता. दिल्ली पोलिसांनी तेथून त्याला ताब्यात घेतले आणि सैन्य पोलिसांच्या स्वाधीन केले. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदू चव्हाण विरोधात अनुशासनहीनतेचे पाच खटले सुरू आहेत. याशिवाय मागील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चंदू चव्हाणविरुद्ध धुळ्यातील प्रशासनाकडूनही तक्रारी आल्या होत्या. 

बातम्या आणखी आहेत...