आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Soldier From Nashik District Died In Kupwada Encounter, Indian Army Blows Up 4 Terrorist Bases In POK

कुपवाडामध्ये झालेल्या चकमकीत महाराष्ट्रातील जवानाला वीरमरण, भारतीय सैन्याने पीओकेतील 4 दहशतवादी अड्डे उडवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आज जम्मू-काश्मीरमधील कुपवाडामध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकित महाराष्ट्राचे वीरपुत्र जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज शहीद झाले आहेत. अर्जुन वाळुंज हे चांदवड तालुक्यातील भरवीरचे रहिवासी होते. सोमवार(21 ऑक्टोबर) त्यांचे पार्थिव मुंबईमध्ये आणले जाईल तर मंगळवार(22 ऑक्टोबर) भरवीर येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेमुळे चांदवड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.पाकिस्तानच्या कारवाया सुरुच
 
भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या नापाक कुरापतींना प्रत्युत्तर देत कारवाई सुरु केली आहे. पीओकेत असलेल्या दहशतवादी ठिकाणांवर उखळी तोफांचा मारा करत 4 ठिकाण उद्ध्वस्त केले. या कारवाईत 10 पाकिस्तानी सैनिकांसह अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळतीये. तत्पूर्वी पाकिस्तानने तंगधार भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करून दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. पाकच्या या नापाक कुरापतीनंतर भारतीय सैन्याने हे पाऊल उचलले. बालाकोट एअरस्ट्राईकच्या 8 महिन्यानंतर भारतीय सैन्याने केलेली ही मोठी कारवाई आहे.कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार भागात पाकिस्तानी सैन्याने रात्री दहा ते सकाळी चार वाजेपर्यंत गोळीबार केला. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले तर एका नागरिकाला आपला जीव गमवावा लागला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.